बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 04:10 PM2020-07-29T16:10:17+5:302020-07-29T16:15:49+5:30

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे.

ssc X is also very smart in Konkan | बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे.

कोरोनामुळे शाळांना दि. १५ मार्चपासूनच सुट्टी देण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या भूगोलाचा पेपर बोर्डाला ऐनवेळी रद्द करावा लागला होता. लॉकडाऊनमुळे पेपर तपासणी व निकाल तयार करण्याची प्रक्रिया लांबली. मात्र, बुधवारी दुपारी एक वाजता निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ४१३ शाळांमधून २३ हजार ७३६ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून २२८ शाळांमधील ११ हजार ८८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालक, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा बुधवारी संपली. दहावीच्या परीक्षेसाठी कोकण विभागातून ३५ हजार ६३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरवर्षी जूनमध्ये निकाल जाहीर होतो. परंतु यावर्षी दीड ते दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २२,५४७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२,५०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर २२,२११ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११,१८५ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. तर परीक्षेला ११,१८० विद्यार्थी बसले होते. परीक्षेत ११,०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: ssc X is also very smart in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.