शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

By मेहरून नाकाडे | Updated: June 2, 2023 15:54 IST

राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९८.११ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.१६ टक्केने निकालात घट झाली असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर मंडळाचा ९६.७३ टक्के तर पुणे मंडळाचा ९५.६४ टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर व पुणे मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल नागपूर मंडळाचा असून ९२.०५ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २७ हजार ९२३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २७ हजार ३९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १४ हजार ४९५ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १४ हजार १४२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.५६ टक्के इतके आहे. मंडळातून १३ हजार ४२८ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १३ हजार २५४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.७० टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण १.१४ टक्के अधिक आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून १८ हजार ८४० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १८ हजार ८०१ परीक्षेस बसले होते. त्यातील १८ हजार ४०७ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९७.९० टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ९ हजार १२२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ८ हजार ९२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९८.५४ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावषीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा ०.६४ टक्के इतका अधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालkonkanकोकण