‘इन्फिगो आय केअर’तर्फे २८ पासून विशेष तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:40+5:302021-05-26T04:31:40+5:30
रत्नागिरी : येथील इन्फिगाे आय केअर हाॅस्पिटलतर्फे २८ व २९ मे राेजी काचबिंदू किंवा ग्लुकोमाच्या रुग्णांसाठी विशेष तपासणी शिबिर ...

‘इन्फिगो आय केअर’तर्फे २८ पासून विशेष तपासणी शिबिर
रत्नागिरी : येथील इन्फिगाे आय केअर हाॅस्पिटलतर्फे २८ व २९ मे राेजी काचबिंदू किंवा ग्लुकोमाच्या रुग्णांसाठी विशेष तपासणी शिबिर आयाेजित करण्यात आले आहे़
काचबिंदू ही दृष्टीला घातक असणारी व्याधी आहे. काचबिंदूमध्ये डोळ्यांची स्थिती ओळखण्यासाठी डोळ्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये डोळ्याचे प्रेशर तपासले जाते. डोळ्याचा दाब किंवा प्रेशर तपासण्यासाठी टोनोमेट्रो नावाची तपासणी केली जाते़ तसेच गौण दृष्टी नष्ट होत आहे का, हे तपासण्यासाठी ‘व्हिजुअल फील्ड’ चाचणी केली जाते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काचबिंदू या विषयातील सुपर स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टर्स व सुविधा उपलब्ध नाही़ त्यामुळे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये काचबिंदू निदान विभाग सुरू करण्यात आला आहे.
या विभागात प्रशिक्षित डॉ. लसिका गावस या काचबिंदू असलेल्या रुग्णाची दिनांक २८ आणि २९ मे २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत तपासणी करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काचबिंदू रुग्णांची संख्या लक्षणीय असून, अशा लोकांनी या संधीचा फायदा घेऊन आपली नेत्रतपासणी करावी, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे. या शिबिरासाठी नाेंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे़