रत्नागिरी : बालकांचे लेंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदयानुसार (पोक्सो) प्रलंबित आणि नवीन दाखल होणारे खटले जलद गतीने निर्णीत करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय, रत्नागिरी या ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त महिला सत्र न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून महिला अभियोक्ता मेघना नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेमध्ये ज्याठिकाणी ९०० पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत अशा जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने इतर जिल्ह्यांबरोबर रत्नागिरी जिल्हा याठिकाणी विशेष जलदगती पोक्सो न्यायालय स्थापन करण्याबाबत राज्य सरकारला कळविले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाची स्थापन करण्यात आली. विशेष पोक्सो न्यायालय जलदगतीने खटल्यांचा निपटारा करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम्. क्यू. एस्. एम्. शेख यांच्या हस्ते या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश - ९ एल. डी. बिले, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत, दिवाणी न्यायाधीश डी. एस्. झंवर, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए. एम्. सामंत, मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. इटकलकर, सहदिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस्. एन्. सरडे, सहदिवाणी न्यायाधीश ए. ए. वाळूजकर, एन्. सी. पवार, एस्. एस्. मतकर, आर्. एस्. गोसवी, पी. एस्. गोवेकर, जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. गांधी, सरकारी अभियोक्ता मेघना नलावडे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक अंतर ठेवून हा कार्यकम आयोजित केला होता.
रत्नागिरीत विशेष पोक्सो न्यायालयाची स्थापना, वैजयंतीमाला राऊत न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:20 IST
Special Pokso Court, Ratnagiri, new Judge बालकांचे लेंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदयानुसार (पोक्सो) प्रलंबित आणि नवीन दाखल होणारे खटले जलद गतीने निर्णीत करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय, रत्नागिरी या ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
रत्नागिरीत विशेष पोक्सो न्यायालयाची स्थापना, वैजयंतीमाला राऊत न्यायाधीश
ठळक मुद्देविशेष सरकारी अभियोक्तापदी मेघना नलावडे जलदगतीने खटल्यांचा निपटारा होणारधीश