शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांसाठी विशेष मेळाव

By admin | Updated: January 14, 2015 23:37 IST

तीन ठिकाणी आयोजन : एकाच ठिकाणी मिळणार आधार, पॅनकार्डे

रत्नागिरी : माजी सैनिकांना सोयी, सवलती, आर्थिक मदत घेण्यासाठी आधारकार्ड तसेच सैन्य सेवा पेन्शनसाठी बँकेच्या खात्याशी आधारकार्ड व पॅनकार्ड जोडणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जिल्ह्यात खेड, रत्नागिरी आणि चिपळूण या ठिकाणी विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांना शासनाच्या माध्यमातून आणि सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून मिळणाऱ्या सोयी, सवलती, आर्थिक मदत घेण्यासाठी आधारकार्ड तसेच सैन्य सेवा पेन्शनसाठी बँकेच्या खात्याशी आधारकार्ड व पॅनकार्ड जोडणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक, विधवा व अवलंबित यांना आधारकार्ड व पॅनकार्ड काढण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यात विशेष माजी सैनिक मेळावे (आधार, पॅनकार्ड कॅम्प) आयोजित करण्यात आले आहेत. आधार, पॅनकार्ड नोंदणीसाठी मंगळवार, दिनांक २० रोजी सकाळी १० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह खेड, बुधवार २१ रोजी सकाळी १० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण. गुरुवार २२ रोजी सकाळी १० वाजता माजी सैनिक विश्रामगृह, रत्नागिरी येथे विशेष माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत आधारकार्ड तसेच पॅनकार्ड काढणारे पथक त्यांच्या आवश्यक सामुग्रीसह उपलब्ध राहणार आहे. आधारकार्ड (मोफत) काढण्यात येणार असून, पॅनकार्ड मात्र १२० रुपयांत काढून देण्यात येणार आहे. आधारकार्ड काढायला येताना, सोबत आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून रेशनकार्ड, जन्मतारखेचा पुरावा म्हणून एसएससी प्रमाणपत्र, जन्मदाखला, विवाह नोंदणी दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, त्याचबरोबर सध्या राहत असलेल्या पत्त्याचा पुरावा (लाईटबिल, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना आदी) घेऊन येणे आवश्यक आहे.माजी सैनिकांनी मेळाव्यास उपस्थित राहून, त्यांच्या आधारकार्डची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे करणे आवश्यक आहे. माजी सैनिकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)