शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कोकणातील पर्यटन स्थळांचे ‘आगर’ असलेले गुहागर; कुठं काय बघाल..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 5:37 PM

भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते

संकेत गोयथळेगुहागर : निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला गुहागर तालुका पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ‘गुह’ म्हणजे कार्तिकस्वामी, त्यांनी संरक्षिलेले ‘आगर’ म्हणून गुहागर असे नाव पडल्याचे सांगितले जाते. तर, भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मनसाेक्त निसर्गाचा आनंद लुटता येताे. तालुक्यातील वेळणेश्वर आणि हेदवी ही ठिकाण पर्यटनाचे केंद्र बनले आहे.

पालशेची पुराश्मयुगीन गुहाप्रा. डॉ. अशोक मराठे यांनी शोधलेली गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ आजही असंख्य पर्यटक- अभ्यासकांना खुणावते आहे. किमान ९० हजार वर्षे जुनी, भारताच्या साडेसात हजार किलाेमीटर लांब समुद्रकिनाऱ्यावरील ही पहिली गुहा आहे. ही गुहा म्हणजे, जगाच्या पुरातत्त्वीय पटलावर दिमाखाने मिरवू शकणारा आणि या विषयात जगात भारताची मान उंचावण्याची क्षमता असलेला अनमोल ठेवा आहे. याकडे शासनासह समाजाने 'पर्यटन' म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.

बामणघळहेदवीचा दशभूज गणेश सर्व परिचित आहे, त्याचबरोबर हेदेवी गावाला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन येथील खडकावर एक मोठी अरुंद भेग (घळ) निर्माण झाली आहे. भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी या घळईत जोराने घुसते व एखाद्या कारंज्याप्रमाणे वेगाने वर उसळते. ही घळ आता ‘बामणघळ’ म्हणून प्रसिद्ध आहे.

बुधल सडाबुधल गाव, बुधल सडा किंवा बुधल कोंड ही ठिकाणे सर्वसामान्य पर्यटकांच्या गुहागर दर्शनच्या यादीत नाहीत. गुहागर-वेळणेश्वर रस्त्यावर अडूर येथे उजवीकडे वळून जाणारा रस्ता थेट बुधल या ३०-४० उंबरठा असलेल्या गावात जातो. अडूर हे गाव पूर्वी ‘आड्यपूर’ नावाने ओळखले जात होते. या गावाच्या समुद्रकाठी असलेला भाग म्हणजे ‘बुधल’. याचेही पूर्वीचे नाव ‘बुद्धीलग्राम’ अथवा ‘बुद्धीलदुर्ग’ असे होते. त्या काळी हे एक चांगले बंदर होते.

हेदवी, वेळणेश्वरगुहागरच्या पर्यटन स्थळांमध्ये हेदवी व वेळणेश्वरचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. वेळणेश्वर हे बाराशे वर्षांपूर्वीपासून असलेले गाव आहे. ‘वेळेला’ म्हणजे ‘समुद्रकिनारा’ त्या तीरावर असणारा देव तो ‘वेळणेश्वर’. तसेच नवसाला पावला वेळ न लावणारा म्हणून ‘वेळणेश्वर’ अशी आख्यायिका आहे. वेळणेश्वर बरोबरच हेदवी गावच्या दशभूज गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय पर्यटक जात नाहीत.

दुसऱ्या बाजीरावाचा वाडारघुनाथ पेशवे व आनंदीबाई यांचा पुत्र दुसरा बाजीराव यांचा वाडा म्हणजेच ‘बाजीरावाचा वाडा’. असगोली वाळकेश्वर मंदिरापासून चढावाच्या रस्त्यात सागरी महामार्गावर हा वाडा होता. ही जागा खासगी असल्याने वाडा पाडून त्याच्या पायावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. येथून एका नजरेत गुहागरचा सात किलोमीटरचा संपूर्ण समुद्रकिनारा पाहायला मिळतो. गुहागर शहरात आज जिथे सार्वजनिक बांधकाम कार्यालय आहे ते ‘आनंदीबाई’चे पूजाघर मानले जाते.

गोपाळगड - अंजनवेलगुहागरपासून अंजनवेल गावातून थेट किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे. एकूण सात एकर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याची बरीचशी तटबंदी शाबूत आहे. जमिनीच्या बाजूने खंदक खोदलेला आढळतो. मूळ वरचा किल्ला विजापूरकरांनी १६ व्या शतकात बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६६० च्या दाभोळ स्वारीच्या वेळी त्यांनी अंजनवेलचा हा किल्लाही ताब्यात घेतला होता.

टाळकेश्वर दीपगृहशेजारीच असलेल्या टाळकेश्वर मंदिरामुळे यासही टाळकेश्वर ‘दीपगृह’ म्हणतात. हे दीपगृह १९६० साली उभारण्यात आले आहे. दीपगृहाच्या उंच मनोऱ्यावरही तिकीट काढून जाता येते. इतक्या उंचीवरून अथांग निळा समुद्र आणि आजूबाजूचा परिसर असे चौफेर दर्शन घडते. गोपाळगडाबरोबरच दीपगृहावरून अथांग समुद्रकिनारा पाहण्याला पर्यटक पसंती देतात. अंजनवेल दीपगृहाशेजारीच टाळकेश्वर मंदिर आहे. तसेच मंदिराच्या खालील बाजूस डोंगराच्या सुळक्याला छोटी बांधकाम तटबंदी करून करण्यात आलेल्या ‘टायटॅनिक पॉईंट’वरून समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकावर पाहता येतात.

एन्राॅन प्रकल्प व धोपावे फेरीबोट सेवागुहागरवरून दापोलीकडे जाताना रस्त्यालगेचच बहुचर्चित इंधन प्रकल्प म्हणजेच सध्याचा आरजीपीपीएल कंपनी पाहायला मिळते. त्यानंतर वीस वर्षांपूर्वी कोकणात प्रथमच झालेली धोपावे-दाभोळ फेरीबोट सेवेतून वाहनासह पलीकडे जाण्याचा व खाडी दर्शन करण्याचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येतो.

गुहागरचे व्याडेश्वर मंदिरगावच्या बाजारपेठेतच श्री व्याडेश्वराचे प्राचीन देवस्थान आहे. गुहागरमध्ये पूर्वी खूप वाड्या होत्या, त्या ‘वाड्यांचा देव’ तो व्याडेश्वर किंवा परशुराम शिष्य ‘व्याडी’ मुनींनी स्थापना करून त्यावर वाडा बांधला म्हणून ‘व्याडेश्वर’ किंवा ‘वाड’ म्हणजे ‘तबेल्या’ जवळ हे लिंग सापडले म्हणून ‘व्याडेश्वर’ नाव पडले, अशा कथा सांगतात.

समुद्रकिनाऱ्याची तब्बल सात किलोमीटर लांबी

गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याची तब्बल सात किलोमीटर लांबी आहे. चेन्नई येथील मरीना बीच १२ किलोमीटर असून, तो जगात तिसऱ्या स्थानावर आहे. सलग सात किलोमीटर लाभलेली किनारपट्टी व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात डुंबण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही.

गुहागरमधील समुद्रकिनारेगुहागर, पालशेत, अडूर - बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ.

प्रसिद्ध मंदिरेव्याडेश्वर मंदिर, दुर्गादेवी मंदिर, वेळणेश्वर मंदिर, हेदवी दशभुज गणेश मंदिर.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनguhagar-acगुहागर