मिनी लाॅकडाऊन जाहीर हाेताच गणपतीपुळे सुनेसुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST2021-04-06T04:30:44+5:302021-04-06T04:30:44+5:30

गणपतीपुळे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे सरकारकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आलेल्या पर्यटकांनी परतीच्या ...

As soon as the mini lockdown was announced, Ganpatipule was heard | मिनी लाॅकडाऊन जाहीर हाेताच गणपतीपुळे सुनेसुने

मिनी लाॅकडाऊन जाहीर हाेताच गणपतीपुळे सुनेसुने

गणपतीपुळे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे सरकारकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आलेल्या पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलून जाणारा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा सुनासुना झाला हाेता.

गेले काही दिवस लॉकडाऊन होणार याच कारणामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गर्दी कमी झाली होती. मात्र कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे आलेल्या पर्यटकांना आपण कुठे तरी अर्ध्यावरच अडकून राहण्यापेक्षा आपल्या घरी पोहोचलेले बरे या कारणास्तव गणपतीपुळ्यातील पर्यटकांनी आपापल्या गावी जाणे पसंत केले.

तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार असल्याचे जाहीर होताच पुन्हा एकदा गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील स्वयंभू श्रीगजाननाचे मंदिर दर्शनासाठी बंद होणार की काय? असा प्रश्न येथील स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांना सतावत आहे. जर दर्शनासाठी मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आले तर येथील स्थानिक व्यापारी यांचे फार मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच मॉल व दुकानेसुद्धा बंद राहणार असल्यामुळे खरेदीसाठी दुकानातून गर्दी झाली होती. हे नवीन निर्बंध ३० एप्रिलपर्यंत राहणार आहेत. त्यामुळे सध्या गणपतीपुळे परिसरात लॉकडाऊनची चर्चा पाहण्यास मिळत आहे.

पुन्हा एकदा येथील लॉज व्यवसाय, हॉटेल्स व्यवसाय ठप्प होणार आहेत. पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: As soon as the mini lockdown was announced, Ganpatipule was heard