मंगेश महाडिक उपोषणाला बसताच अधिकाऱ्यांचे उघडले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:31 AM2021-04-10T04:31:17+5:302021-04-10T04:31:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : दापाेली - केळशी बस व्हाया आंजर्ले करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सामाजिक ...

As soon as Mangesh Mahadik went on hunger strike, the eyes of the officers were opened | मंगेश महाडिक उपोषणाला बसताच अधिकाऱ्यांचे उघडले डोळे

मंगेश महाडिक उपोषणाला बसताच अधिकाऱ्यांचे उघडले डोळे

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : दापाेली - केळशी बस व्हाया आंजर्ले करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते मंगेश महाडिक यांनी ९ एप्रिल राेजी उपाेषण पुकारले हाेते. बस सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी तयारी दर्शविली हाेती. मात्र, अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बस सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपाेषण स्थगित केले.

गेले सात महिने महाडिक यांनी दापोली एस. टी. आगाराकडे विनंती करूनही दाद न दिल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसले हाेते. गेल्या पावसाळ्यात आंजर्ले - पाडले दरम्यान समुद्र उधाणाने केळशी रस्ता खचला आहे. त्यामुळे दापोली व्हाया आंजर्ले केळशीकडे जाणारी बस गेले सात - आठ महिने बंद आहे. बस बंद असल्यामुळे आंजर्लेवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. आंजर्लेमार्गे केळशी ही बस वर्षानुवर्षे सुरू होती. मात्र, सावणे पुळण येते रस्ता खचल्याने केळशी बस आंजर्ले गावात येत नसून बोरथळ मार्गे केळशी गावाला जात आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. अखेर महाडिक शुक्रवारी उपाेषणाला बसताच एस. टी. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत गाडी सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले.

Web Title: As soon as Mangesh Mahadik went on hunger strike, the eyes of the officers were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.