शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या शोधासाठी सामाजिक संघटना सरसावल्या

By admin | Updated: November 15, 2015 23:49 IST

भीक नकोय; भाऊ हवाय... : उपचारासाठी ‘तिची’ जिल्हा रुग्णालयात रवानगी--अभागी बहिणीची अधुरी कहाणी...

सातारा : ऐन थंडीच्या कडाक्यात वैफल्यग्रस्त अवस्थेत जिल्हा रुग्णालय परिसरात भटकत राहणाऱ्या ‘तिच्या’ अभागीपणाची व्यथा शनिवारी भाऊबीजेदिवशी ‘लोकमत’नं मांडली. ‘माझा भाऊ खंबीर आहे, नकोय तुमची मदत’ असे स्वाभिमानाने सांगणाऱ्या ‘तिच्या’ भावाच्या शोधासाठी आता सामाजिक संघटना सरसावल्या आहेत. दरम्यान, रविवारी त्या निराधार महिलेची उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवानगी केली आहे.जिल्हा रुग्णालय परिसरात ‘ती’ कठड्यांच्या आडोशाला बसल्याचे अनेकांनी पाहिले असेल. थंडी वाढल्यामुळे भिंतीला चिकटून रात्री तिथेच झोपी जात असल्यामुळे काही नागरिकांनी तिला महिला सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय घेतला; पण ‘ती’ भलतीच स्वाभिमानी. ‘माझा भाऊ खंबीर आहे मला मदत करायला... मला नकोय तुमची मदत’ असे म्हणून तिने मदत नाकारली. रविवारी जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार व भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक शिवाजी खुडे हे सकाळी साडेअकरा वाजता त्या महिलेला पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिला ब्लँकेट व साडी दिली. खायला दिले. पण उभे राहता येत नसल्यामुळे तिने दवाखान्यात गेल्यावरच साडी नेसेन, असे सांगितले. नातेवाइकांबाबत चौकशी केली असता, तिच्याकडून असंबध उत्तरे येत होती. पवार आणि खुडे यांनी जिल्हा रुग्णालयात त्या निराधार महिलेची परिस्थिती सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला स्ट्रेचरवर बसवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शारीरिक वेदनेने ती विव्हळत होती. असंबंध काही तरी बडबडत होती. (प्रतिनिधी) तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढची दिशारुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला अ‍ॅडमिट करून घेतले आहे. डॉ. अरुंधती कदम यांनी त्या महिलेच्या तब्येतीबाबत चौकशी केली. सर्व तपासण्या करून त्याचा अहवाल सोमवारी दिला जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अहवाल मिळाल्यानंतरच त्या महिलेला कुठे ठेवायचे, याबाबत निर्णय होणार आहे.रुग्णालय परिसरात बघ्यांची गर्दीसकाळी भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक शिवाजी खुडे आणि सिद्धी पवार यांनी त्या महिलेची विचारपूस केली. ती कधी देवाची गाणी म्हणायची तर कधी पोटात खूप दुखतंय, मला जास्त बोलता येत नाही असे बडबडायची. जवळपास दोन ते अडीच तास ते महिलेची विचारपूस करत होते. यावेळी रुग्णालय परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.