शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास केंद्रातील बनावट परीक्षार्थी प्रकरण: कॉलेज अधिष्ठाता, प्राचार्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

By मेहरून नाकाडे | Updated: June 12, 2024 17:04 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील शासकिय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या ...

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील शासकिय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शहरातील काही नागरिकांनी मंगळवारी (दि.११) उघडकीस आणला. संबधीत प्रकाराची तक्रार अभाविपने स्थानिक पोलीसांकडे केली असता पोलिसांनी काॅलेज अधिष्ठाता, प्राचार्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.शासनाकडून रत्नागिरीत चालवल्या जाणार्या या कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस प्रशिक्षणार्थी बसवून परिक्षा घेतल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेण्यार्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरु आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी बोगस विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहे. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, जागृत नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी मंगळवारी (दि.११ रोजी) हा प्रकार उघडकीस आणला.अभाविपने स्थानिक पोलीसांकडे याबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यांनतर शहर पोलीसांचे पथक कौशल्य विकास केंद्रात दाखल झाले होते. पोलीसांनी तेथे परिक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती संकलीत करून काैशल्य विकास केंद्राचे अधिष्ठाता अमोल गोठकडे, प्राचार्य रचना व्यास, श्रीनिवास माने, श्वेता खानविलकर, फईम नाजीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण, व अज्ञात इसम (पत्ता माहित नाही) यांनी संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी या केंद्रातील कर्मचारी व श्वेता खानविलकर, फईम नाजीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण याचा वापर करून त्या आधारे बोगस उमेदवार बसवून शासनाची फसवणूक केली. तसेच यापूर्वी घेतलेल्या परीक्षेतील फसवणुकीसाठी वापरलेले बनावट आधारकार्ड परिक्षार्थींकडून काढून घेवून त्याची विल्हेवाट लावली म्हणून आरोपी काैशल्य विकास केंद्राचे अधिष्ठाता अमोल गोठकडे, प्राचार्य रचना व्यास, श्रीनिवास माने, श्वेता खानविलकर, फईम नाजीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण, व अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस