शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खाेटे साेन्याचे नाणे देऊन तरुणाला सहा लाखांचा गंडा

By अरुण आडिवरेकर | Updated: October 5, 2023 16:31 IST

रत्नागिरी : गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने खाेटे सोन्याचे नाणे देऊन एका २८ वर्षीय तरुणाला ६ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ...

रत्नागिरी : गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने खाेटे सोन्याचे नाणे देऊन एका २८ वर्षीय तरुणाला ६ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी दिनकर (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) नावाच्या भामट्याविराेधात रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार ९ सप्टेंबर २०२३ ते २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला असून, फसवणूक झालेला तरुण मूळचा सांगली जिल्ह्यातील राहणार आहे. सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील एक तरुण रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे राहताे. त्याने एक दुचाकी (एमएच ०४, केके ८४५१) विक्री करण्यासाठी ओएलक्स वर टाकले हाेते. या जाहिरातीच्या अनुषंगाने गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दिनकर नावाच्या व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने आपल्याकडे साेन्याचे नाणे असल्याचे तरुणाला सांगितले. हे दाेघे रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान एका ठिकाणी भेटले. या भेटीत त्याने हे नाणे तरुणाकडे देऊन त्याच्याकडून ६ लाख रुपये घेतले.मात्र, त्यानंतर तरुणाने नाण्याबाबत खातरजमा केली असता हे नाणे खाेटे असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाेलिसांनी ४ ऑक्टाेबर राेजी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस