भर पावसात कोतवडे नेवरे मार्गावर बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 19:51 IST2023-10-01T19:51:43+5:302023-10-01T19:51:58+5:30

कोतवडे नेवरे मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागा आहेत.

sighting of a leopard on the kotwade navare route in full rain | भर पावसात कोतवडे नेवरे मार्गावर बिबट्याचे दर्शन

भर पावसात कोतवडे नेवरे मार्गावर बिबट्याचे दर्शन

मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : तालुक्यात रविवारी (दि.१) पावसाने सर्वत्र जोर धरला होता. मुसळधार पावसात कोतवडे नेवरे मार्गावर वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे वाहन चालक, परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

कोतवडे नेवरे मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागा आहेत. शिवाय परिसरात काही ठिकाणी रिसाॅर्ट उभे राहिले आहे. परंतु काही भागात झाडी भरपूर आहे. बागायती लागवडीसाठी व रिसाॅर्टसाठी जंगलतोड झाल्याने वन्य प्राण्याचा अधिवास संपुष्टात आल्याने दिवसाढवळ्या बिबट्या मुख्य रस्त्यावर फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही किलोमीटर मानवीवस्ती असल्याने या मार्गावर रात्री-अपरात्री येताना भिती वाटत होती. परंतु आता दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ, वाहनचालक भयभयीत झाले आहेत. वन्य विभागाने याची दखल घेत त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Web Title: sighting of a leopard on the kotwade navare route in full rain