शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीची शिवानी दोन हजार तासांच्या विमान उड्डाणासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:14 IST

रत्नागिरी : बालपणी पायलट होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्द, प्रयत्न व कठोर परिश्रमाने रत्नकन्या शिवानी सुबोध नागवेकर हिने सत्यात उतरवले ...

रत्नागिरी : बालपणी पायलट होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्द, प्रयत्न व कठोर परिश्रमाने रत्नकन्या शिवानी सुबोध नागवेकर हिने सत्यात उतरवले आहे. सध्या हरयाणा गुडगाव येथे पायलट प्रशिक्षण घेणारी शिवानी २००० तासांचे विमान उड्डाण प्रवास झाल्यावर लवकरच ती मुख्य पायलट म्हणून सेवेत रुजू होणार आहे. शिवानीने घेतलेल्या या भरारीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.रत्नागिरीत जन्मलेली शिवानी रत्नागिरीतील ज्येष्ठ व्यायामपटू भाई विलणकर यांची नात व श्रद्धा आणि सुबोध नागवेकर यांची कन्या आहे. शिवानीला बालपणापासून विमानाची आवड होती. मात्र, केवळ हवाई सफर न करता आपण स्वत: ते उडवायचे अशी जिद्द तिने मनाशी बाळगली हाेती. त्यामुळेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच अचानक तिने हे शिक्षण थांबवून थेट मुंबई गाठली. पायलट होण्यासाठी बीएससी एव्हिनेशनसाठी प्रवेश घेतला. पायलट होण्यापूर्वी अभ्यासक्रम व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बारामती येथील रेड बर्ड फ्लाईंग अकॅडमीमध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिथेही तिने २०० तास विमान चालविण्याचे प्रात्यक्षिक पूर्ण केले.

अभ्यासक्रमात तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिची इंडिगो कंपनीत निवड झाली आहे. तेथील चार टप्प्यांत तिने प्रशिक्षण पूर्ण केले. दिल्लीमध्ये मुलाखत तर हैदराबाद येथील परीक्षेतही तिने यश मिळविले. सध्या कंपनीच्या माध्यमातून तिचे गुडगाव येथे प्रशिक्षण सुरू आहे. चिकाटी, परिश्रम व सचोटीच्या जोरावरच शिवानीने अल्पावधीत यश संपादन केले आहे. शिवानीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांसह आजोबांचेही पाठबळ लाभले. त्यांच्या प्राेत्साहनामुळेच तिने यशाचे शिखर गाठले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीairplaneविमान