रत्नागिरी - अचानक सुरू झालेल्या भारनियमनाविरोधात रत्नागिरी जिल्हा शिवसेनेने महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. भारनियमन तत्काळ रद्द करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
भारनियमनाविरोधात शिवसेनेचा रत्नागिरीत महावितरण कार्यालयावर मोर्चा, जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:20 IST