महागाई विरोधात शिवसेनेचा राजापुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:28 IST2017-10-09T14:25:39+5:302017-10-09T14:28:36+5:30

चला मिळून ताई माई, रोखू आपण महागाई, बंद करा भेदाभेद, महागाईचा करा निषेध अशा घोषणा देत आज राजापुरात शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

Shiv Sena's Rajpura Morcha against inflation | महागाई विरोधात शिवसेनेचा राजापुरात मोर्चा

राजापुरात शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देआमदार राजन साळवी यांचे नेतृत्वमोर्चा राजापूर बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय राजापूर तहसीलदार यांना निवेदन

राजापूर,9 : चला मिळून ताई माई, रोखू आपण महागाई, बंद करा भेदाभेद, महागाईचा करा निषेध अशा घोषणा देत आज राजापुरात शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला, ग्रामस्थदेखील सहभागी झाले होते. त्यानंतर राजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

वाढत्या महागाई विरोधात राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली आज राजापूर बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी महागाई विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येताच संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

या मोर्चामध्ये अनुजा साळवी, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena's Rajpura Morcha against inflation