शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:24 IST

रिफायनरी प्रकल्प होणारच नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने सत्तेत आल्यानंतरही अनेकदा जाहीर केली आहे. खरेतर आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी सर्वच राज्यकर्ते धडपडतात. शिवसेना मात्र चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणारा प्रकल्प नाकारत आहे

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प -शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोचीभाजपला शिवसेनेवर भूमिका बदलल्याची टीका

मनोज मुळ्येरत्नागिरी - रिफायनरी प्रकल्प होणारच नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने सत्तेत आल्यानंतरही अनेकदा जाहीर केली आहे. खरेतर आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी सर्वच राज्यकर्ते धडपडतात. शिवसेना मात्र चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणारा प्रकल्प नाकारत आहे.यामागे काय कारण असावे? निवडणुकीत प्रकल्पाला विरोध केला, मग आता प्रकल्प उभारायचा, अशी शिवसेनेची राजकीय गोची झाली आहे का? की इतर पक्षांना विशेषत: भाजपला शिवसेनेवर भूमिका बदलल्याची टीका करण्याची संधी मिळेल म्हणून प्रकल्प नाकारण्याचा हट्ट आहे? कारण काहीही असले तरी प्रकल्प नाकारण्याने नुकसान होणार हे नक्की आहे.कोकण आणि उद्योग यांची नाळ तशी पटकन जुळत नाही. आंदोलनाशिवाय आलेला प्रकल्प कोकणात दिसतच नाही. वर्षानुवर्षे मनिऑर्डवरच जगणारा हा भाग गेल्या २०-२२ वर्षात स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडत आहे. मात्र, पुरेसे राजकीय पाठबळ नसल्याने आणि राज्यातील (सर्वच पक्षांच्या) सरकारांची धोरणे डळमळती असल्याने कोकणाला विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना कधीच उभारी मिळाली नाही.

रत्नागिरीतील फिनोलेक्स प्रकल्प असेल, जयगडमधील जिंदल प्रकल्प असेल किंवा गुहागरचा एन्रॉन प्रकल्प असेल या साऱ्यांनाच जनआंदोलनांना तोंड द्यावे लागले आहे. आताच्या घडीला एन्रॉन वगळला तर उर्वरित दोन प्रकल्पांमुळे निर्माण झालेला रोजगार, त्यामुळे झालेले बदल याचा विचार आवर्जून करायला हवा. जर हे प्रकल्प उभे राहिले नसते तर सध्या मिळालेला रोजगारही हाती उरला नसता.स्थलांतराचा शाप पुसण्यासाठी आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे उद्योग येण्याची आवश्यकता आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे ही आशा निर्माण झाली होती. मात्र, हा प्रकल्प आणणाऱ्या शिवसेनेनेच नंतर लोकांना हवे ते असे म्हणत रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला. स्थानिकांना हवे असेल तर प्रकल्प येथे होईल, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत दुर्दैवाने फक्त एकच बाजू ऐकून घेतली आहे.

राजापूरचे आमदार, रत्नागिरीचे खासदार, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यापैकी कोणीही या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. प्रकल्प हवाय, असे म्हणणाऱ्यांना दलाल म्हणणे एवढाच शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम आहे. पण खरोखरच जे समर्थन करत आहेत, त्यांच्या जागा प्रकल्पासाठी जात आहेत की नाही, त्यांना काय म्हणायचे आहे, यातील कोणतीही बाजू ऐकूून न घेता शिवसेनेने एकतर्फी निर्णय घेतले आहेत.रिफायनरी प्रकल्प हा फक्त राजापूरपुरता किंवा जिल्ह्यापुरता नाही. या प्रकल्पाचे सकारात्मक पडसाद राज्यभर उमटू शकतात. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे असंख्य व्यवसाय उभे राहू शकतात. अर्थात प्रकल्प हवा की नको, हा पुढचा टप्पा झाला. पण राजापूरचे आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री यांनी आतापर्यंत समर्थकांची एकदाही भेट घेतलेली नाही.

फक्त प्रकल्प विरोधकांचे म्हणणे ऐकून तेच स्थानिक असल्याचे शिवसेनेला वाटत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमध्ये अनेकजण राजापूर तालुक्याबाहेरचे आहेत. विरोध करण्यासाठी ते चालतात. पण प्रकल्पाचे समर्थन करणारे लोक स्थानिक, त्यातही भूमिपुत्र असले तर ते मात्र शिवसेनेच्यादृष्टीने दलाल आहेत.लोकसभा निवडणुकीत युती दावणीला लावून भाजपकडून प्रकल्प रद्दची घोषणा पदरात पाडून घेणाºया शिवसेनेला आता बहुदा मागे फिरायची संधी राहिलेली नाही. मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे अलिकडेच एका मुलाखतीत रिफायनरीबाबत एक उत्तम वाक्य बोलले होते. पक्ष म्हणून एखाद्या प्रकल्पाबाबतची भूमिका मांडणे वेगळे आणि सरकार म्हणून प्रकल्पाबाबत भूमिका मांडणे वेगळे. या वाक्यामुळे रिफायनरी समर्थकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र, बहुदा आता मुख्यमंत्र्यांनी रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका घेऊ नये, यासाठी पक्षातूनच दबाव आणला जात आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

सरकार म्हणून राज्यात होणारी गुंतवणूक, रोजगार निर्मिती, महसूल वाढीचे पर्याय या साऱ्याचा विचार करून धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. पक्षाचा निर्णय हा केवळ भावनांच्या आधारे घेता येतो. कदाचित यातच शिवसेनेची गोची झाली आहे.

प्रकल्पाला समर्थन दिले तर कोलांटीउडी मारल्याची टीका केली जाईल, अशी भीती शिवसेनेला असावी. त्यातही भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे शिवसेनेला आता प्रकल्पाचे समर्थन करता येत नसावे. राज्याची गरज लक्षात घेता प्रकल्पाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना वाटते.रिफायनरी आणावी की आणू नये, हा निर्णय सरकारने नंतर घ्यावा. पण ज्यांना प्रकल्प यावा, असे वाटते अशा लोकांना समोर बसवून त्यांचे म्हणणे तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायला हवे. त्यात खरोखर स्थानिक लोक आहेत की नाहीत, हे तपासून, त्याचे शास्त्रीय कंगोरे तपासून नंतर सरकारने (एखाद्या पक्षाने नव्हे) निर्णय घ्यावा. पण त्यासाठी दोन्ही बाजू त्यांनी ऐकणे अपेक्षित आहे. एक बाजू ऐकून हट्टाने निर्णय घेणे हा पक्षपात आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग