शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शिवसेनेत भाऊबंदकी, आघाडीत अजून तिढाच, इच्छुक वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:30 IST

विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी उमेदवारीवरून विधानसभेची तिकीटबारी आतापासूनच हलू लागली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिकत्त्वाचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्याने भाऊबंदकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आघाडीतील दोन्ही पक्ष पुढे झाले आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेत भाऊबंदकी, आघाडीत अजून तिढाचइच्छुक वाढले, शह-काटशहचे राजकारण ऐरणीवर

मनोज मुळये रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी उमेदवारीवरून विधानसभेची तिकीटबारी आतापासूनच हलू लागली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिकत्त्वाचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्याने भाऊबंदकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आघाडीतील दोन्ही पक्ष पुढे झाले आहेत.रिफायनरी आंदोलकांचे नेते अशोक वालम यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यानच उमेदवारीचे बिगुल वाजवले होते आणि स्वाभिमानही आता विधानसभेच्या उंबरठ्यावर दाखल होऊ पाहत आहे. त्यामुळे निवडणुकांआधी राजापुरात उमेदवारीच अधिक चुरशीची झाली आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राजापूर विधानसभा मतदार संघात मोठे यश मिळवले आहे. रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेविरोधात रान उठवण्यात आले असले तरीही शिवसेनेने मतांमध्ये मारलेली मुसंडी पाहून यावेळी सेनेतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. गणपतराव कदम यांचा अपवाद वगळता काँग्रेसला अनेक वर्षात या मतदारसंघात यश मिळालेले नाही.शिवसेनेत इच्छुक अधिकलोकसभेत मिळालेल्या यशामुळे शिवसेनेत इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या संपर्कामुळे शिवसेनेला लोकसभेत या मतदारसंघात यश मिळाले. मात्र, आता शिवसेनेतूनच चंद्रप्रकाश नकाशे, पांडुरंग उपळकर, प्रकाश कुवळेकर हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पुढे आले आहे. स्थानिक उमेदवार हा मुद्दा आताही पुढे आला आहे. भाजपच्या राजश्री विश्वासराव याही गेली दोन-तीन वर्षे या मतदारसंघात सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्याही दावा करणार का, असा प्रश्न आहे.काँग्रेस आघाडीत मोका कुणाला?आजवरच्या जागा वाटपात राजापूरची जागा काँग्रेसलाच मिळत होती. राष्ट्रवादीने अनेक वर्षे या मतदार संघात लक्ष दिले नव्हते. मात्र, अजित यशवंतराव यांनी सातत्याने संपर्क ठेवून या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाची अपेक्षा केली जात आहे. काँग्रेसकडून विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांचे नाव चर्चेत आहे. राजापूरचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे खेचण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सद्यस्थितीत अजित यशवंतराव आणि खलिफे हे दोन्ही बलवान उमेदवार आहेत. त्यामुळे संधी कोणाला मिळणार, हा प्रश्न आहे.अशोक वालम यांचेही रिंगणात उतरण्याचे स्वप्नरिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याचे आंदोलन वाढवण्यात सर्वात मोठा पुढाकार अशोक वालम यांचा होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे बिगुल वाजवले आहे. जो रिफायनरीला विरोध करण्यासाठी सहकार्य करेल, त्या पक्षाला आपण पाठिंबा देऊ, असे त्यांनी जाहीर केले होते.शिवसेनेने त्यांना आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र, आता ते स्वत:च इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षात इच्छुक अधिक असल्याने त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. ते स्वाभिमान पक्षाकडून उभे राहतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, त्यांचा प्रमुख भर हा केवळ रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित गावांपुरताच राहण्याची शक्यता आहे.स्वाभिमान एन्ट्री करणारपहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेल्या स्वाभिमान पक्षाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानला निवडक ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांना राजापूरमध्ये उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात स्वाभिमानला मतांसाठी खूप प्रयत्न करावे लागलील

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी