शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गाडीला कट मारला, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी डंपर चालकाला चोपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:34 IST

मंडणगड पाेलिस स्थानकात चाैघांविराेधात गुन्हा दाखल

मंडणगड (रत्नागिरी) : गाडीला कट मारल्याच्या रागातून दापाेली येथील चाैघांनी डंपर चालकाला बेदम चोप दिल्याची घटना रविवारी (२८ मे) सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान दहागाव (ता. मंडणगड) येथे घडली. यामध्ये डंपर चालक जखमी झाला असून, मंडणगड पाेलिस स्थानकात चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे चाैघेही शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असल्याचे समाेर आले आहे.डंपर चालक विनोद खानविलकर (रा. केळवत, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, सुधीर कालेकर व सचिन जाधव यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनाेद खानविलकर हे डंपर (एमएच ०८, बीबी ७४४४) घेऊन कुंबळे ते चिंचाळी असे जात हाेते. कुंबळे ते दुधेरे गावादरम्यान समोरून दापोलीच्या दिशेने लाल रंगाची गाडी येत होती. या गाडीचे चाक रस्त्याच्या कडेला गेल्याने खानविलकर यांनी डंपर सरळ करून चिंचाळीकडे निघाले.त्यानंतर दहागाव येथील गतिराेधकाजवळ डंपरसमोर कार आडवी लावली व यातील भगवान घाडगे यांनी चालक खानविलकर यांना माझ्या गाडीला हूल का दिलीस, असे म्हणून गाडीतून खाली खेचून डंपरमधील लोखंडी राॅडने मारहाण केली, तसेच त्यांच्यासोबत असणारे सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे व सचिन जाधव यांनीही मारहाण केली. यावेळी खानविलकर यांच्या डोक्यामध्ये दगड मारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत डंपरची काच फोडून डंपरचे नुकसान करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी