शिवसेना, राष्ट्रवादीकडून सदस्यांना बजावला व्हीप, विरोधकांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:41 PM2019-09-27T17:41:05+5:302019-09-27T17:45:06+5:30

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी आयोजित केलेल्या खास सभेला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडूनही अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व सदस्यांना व्हीप काढण्यात आला आहे.

Shiv Sena, Nationalist party members whip, opposition protests | शिवसेना, राष्ट्रवादीकडून सदस्यांना बजावला व्हीप, विरोधकांची साथ

शिवसेना, राष्ट्रवादीकडून सदस्यांना बजावला व्हीप, विरोधकांची साथ

Next
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठरावशिक्षक बदल्यांवरून वाद सुरू, संख्याबळाच्या जोरावर बाजी मारणार

रत्नागिरी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी आयोजित केलेल्या खास सभेला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडूनही अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व सदस्यांना व्हीप काढण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांवरुन अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद अधिकच पेटला आहे. अखेर शिवसेनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचे पत्र प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली २५ वर्षे शिवसेनेची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. मात्र, यावेळी युती न झाल्याने शिवसेनेची निर्विवादपणे एकहाती सत्ता आहे. त्यामध्ये ५५ सदस्यांपैकी ३९ सदस्य शिवसेनेचे आहेत, तर राष्ट्रवादीचे १५ आणि भाजपच्या एकमेव सदस्या आहेत. अविश्वास ठरावासाठी आवश्यक असलेल्या ३७ सदस्यांची संख्या शिवसेनेकडे असल्याने हे संख्याबळा पुरेसे आहे. इतर राजकीय पक्षांच्या सदस्यांची आवश्यकता नसली तरी आमदार भास्कर जाधव समर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्य अविश्वास बाजूने मतदान करणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची बदली झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, त्यांची बदली झालेली नाही. त्यामुळे त्या अविश्वास ठरावाला सामोरे जाणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि पक्षप्रतोद उदय बने यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना अविश्वास ठरावाच्या बाजूने व्हीप बजावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि आमदार भास्कर जाधव समर्थक विक्रांत जाधव यांनी १४ सदस्यांना अविश्वास ठरावाच्या वेळी सभागृहात शिवसेनेला मतदान करुन सहकार्य करण्यासाठी व्हीप बजावला आहे. त्यामुळे येत्या ३० तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्यावर अविश्वास मंजूर होणार हे निश्चित झाले आहे.


सदस्यांच्या तक्रारी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल सूद गोयल यांच्या कामकाज पध्दतीबाबत जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारी असल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील कलम ९४ (३)नुसार शासनाने त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेवेतून परत बोलवावे, यासाठी दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संबंधितांनी सभागृहात उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने मतदार करावे, असा पक्षादेश आहे.


राष्ट्रवादीही सेनेच्या बाजूने

राष्ट्रवादीच्या १४ सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असा आपण व्हीप बजावला असून, त्याची अंमलबजावणी सर्व सदस्य करतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला.

Web Title: Shiv Sena, Nationalist party members whip, opposition protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.