शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ‘ती’ शाखा कुणाची?, रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील शाखेवरुन नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:18 IST

रत्नागिरी : उद्धवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेताच रत्नागिरीतील साळवी स्टाॅप येथील शाखा नेमकी ...

रत्नागिरी : उद्धवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेताच रत्नागिरीतील साळवी स्टाॅप येथील शाखा नेमकी काेणाची, असा वाद निर्माण झाला आहे. याच शाखेतून आपला कारभार सुरू करणार असल्याचे तालुकाप्रमुख घाेसाळे यांनी जाहीर केले आहे. तर, याच ठिकाणाहून शिंदेसेनेत दाखल झालेले प्रदीप साळवी आपला कारभार हाकत आहेत. त्यामुळे आता ही शाखा नेमकी काेणाची, असा वाद रंगला आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात नव्या शिलेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाप्रमुखपदी राजापूरच्या दत्तात्रय कदम यांची वर्णी लागली आहे. रत्नागिरीच्या तालुकाप्रमुखपदी शेखर घोसाळे, तर लांजाच्या तालुकाप्रमुखपदी सुरेश करंबेळे, महिला उपजिल्हा संघटक म्हणून राजापूरच्या उल्का विश्वासराव, महिला तालुका संघटक म्हणून लांजाच्या पूर्वा मुळ्ये यांची नियुक्ती केली आहे.उद्धवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर या पदावर शेखर घाेसाळे यांची वर्णी लागली आहे. साळवी स्टाॅप येथील शाखेत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतरही प्रदीप साळवी याच शाखेतून कारभार हाकत आहेत. त्यामुळे ही शाखा नेमकी काेणाची, उद्धवसेनेची की, शिंदेसेनेची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

साळवी स्टॉप शिवसेना शाखा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आली आहे. याच शाखेतून शिवसेनेने कारभार चालवला. आता आपण आपल्या कारभाराची सुरुवातही याच शाखेतून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून करणार आहे. - शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख, उद्धवसेना 

तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शाखेत यावे, त्यांचे स्वागतच असेल, त्यांनी शुभेच्छाही स्वीकाराव्यात. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षात असलो, तरी आमची मन दुभंगलेली नाहीत. - प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शिंदेसेना

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे