शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीमध्ये स्थलांतरासाठी शेल्टर हाऊस, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 18:02 IST

चिपळूण : येत्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यास आपतग्रस्तांची गैरसोय होणार नाही, याबाबतची काळजी सरकार आणि प्रशासन घेत आहे. ...

चिपळूण : येत्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यास आपतग्रस्तांची गैरसोय होणार नाही, याबाबतची काळजी सरकार आणि प्रशासन घेत आहे. कोकण किनारपट्टीवर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास २४८ कोटी रुपये खर्चून २१ शेल्टर हाऊस बांधली गेली आहेत. स्थलांतरासाठी याचा उपयोग होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी चिपळुणात पत्रकार परिषदेत दिली.पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री सामंत यांनी लोटे येथील घटनेचा आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यासंदर्भात महामार्ग विभागाला योग्य त्या सूचना दिल्या गेल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह सुस्थितीत व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून ७५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. चिपळूण शहरातील नालेसफाईतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी करण्याचेही निर्देश दिले असून, दुर्दैवी घटना घडल्यास स्थलांतराबाबत काय करता येईल, अशी कोणती ठिकाणी आहेत, याबाबतचाही एक तक्ता तयार करण्यात आला आहे.तसेच कोकण किनारपट्टीवर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास २४८ कोटी रुपये खर्चून २१ शेल्टर हाऊस बांधली गेली आहेत. स्थलांतरासाठी याचा उपयोग होईल, त्यानंतर सभागृह म्हणून त्याचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.वाशिष्ठीतील एक लाख ८२ हजार क्युबिक मीटर गाळ काढला गेला आहे. काही लोकांनी खत म्हणून हा गाळ विकतही घेतला आहे. पावसाची आकडेवारी दरवर्षी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरडग्रस्त भागाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी पुनर्वसनाबाबत काय करता येईल, याचीही चर्चा झाली आहे.ब्ल्यू आणि रेड लाईनबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असून, वाशिष्ठी नदीतील बेटे काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी आवश्यक आहे. त्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत