विनाेद बैकर यांच्याकडील ‘ती’ बंदूक बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:42+5:302021-04-05T04:27:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : तालुक्यातील साकुर्डे येथील देवरहाटीत शिकारीला गेलेल्या विनोद बैकर यांचा बंदुकीची गाेळी लागून मृत्यू झाला ...

The 'she' gun belonging to Vinay Baker is illegal | विनाेद बैकर यांच्याकडील ‘ती’ बंदूक बेकायदेशीर

विनाेद बैकर यांच्याकडील ‘ती’ बंदूक बेकायदेशीर

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : तालुक्यातील साकुर्डे येथील देवरहाटीत शिकारीला गेलेल्या विनोद बैकर यांचा बंदुकीची गाेळी लागून मृत्यू झाला हाेता. विनाेद यांनी वापरलेल्या बंदुकीच्या मालकाचा शाेध सुरू असतानाच या बंदुकीची जिल्ह्यात काेठेच नाेंद नसल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर बंदूक आली काेठून याचा शाेध आता पाेलीस घेत आहेत.

तालुक्यातील साकुर्डे येथील विनोद बैकर हे ३१ मार्च रोजी जवळच्या देवरहाटी जंगलात शिकारीसाठी गेले हाेते. तेथे त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाेलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता विनोद बैकर यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक पाेलिसांना सापडली हाेती. या बंदुकीचा शोध पोलीस घेत असताना या बंदुकीच्या मालकाचा अद्याप शाेध लागलेला नाही. तसेच या बंदुकीची नोंदही जिल्ह्यात नसल्याची माहिती समोर आली आहे. मग ही बंदूक साकुर्डे येथे कोणी आणली, कशासाठी आणली होती, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तसेच फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अद्याप आलेला नसल्याने विनोद बैकर यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. तसेच याठिकाणी सापडलेल्या बंदुकीवरील हातांचे ठसे काेणाचे आहेत, याचाही शाेध घेण्यात येत आहे. तसेच ते शिकारीसाठी एकटेच गेले होते की त्यांच्यासोबत अन्य कोणी साथीदार होते याचाही शाेध पाेलीस घेत आहेत.

Web Title: The 'she' gun belonging to Vinay Baker is illegal