]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी
By शोभना कांबळे | Updated: September 15, 2023 01:02 IST2023-09-15T01:01:53+5:302023-09-15T01:02:56+5:30
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
![Shankar Berge is the new Upper Collector of Ratnagiri | ]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी Shankar Berge is the new Upper Collector of Ratnagiri | ]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/clipboard1fasder0_2023091086257.jpg)
]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी
रत्नागिरी : काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारीपदी शंकर बर्गे यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा आले.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त पदी शंकर बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. बर्गे यांनी यापूर्वीही रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. तसेच रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
सध्या ते सिंधुदुर्ग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता पुन्हा रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
तसेच बर्गे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर रवी जनार्दन पाटील यांची नियुक्ती झाली आहे.