शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची तीव्र टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:15 IST

गंभीर रुग्णांसाठी रक्तपुरवठा नियमित ठेवण्याचे आव्हान

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताची गरज वाढली आहे. दरवर्षी या रक्तपेढीतून सुमारे पाच हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करावे लागत होते. मात्र, आता केवळ मोफत पुरवठा करण्यासाठी वर्षाला पाच हजार रक्ताच्या बॅगा लागत आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने सध्या मागणी वाढली आहे. त्यामुळे या रक्तपेढीला रक्ताची तीव्र टंचाई भासू लागली आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीवर जिल्ह्यातील रुग्ण अवलंबून असतात. आता शासनाने सर्वच घटकांसाठी उपचार मोफत केल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विविध आजारांंबरोबरच अपघातग्रस्त, थॅलेसेमिया, राष्ट्रीय कार्यक्रम, अपघात, ॲनेमिया, कर्करोग, डायलिसिस, शस्त्रक्रिया, सिझर, माजी सैनिक आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.पूर्वी या रक्तपेढीची वार्षिक पाच हजार रक्त बॅगांची मागणी होती. मात्र, आता ही मागणी वाढली असून, मोफत पुरवठाच आता जवळपास पाच हजार बॅग इतका करावा लागत आहे. त्यामुळे आता या रक्तपेढीला रक्ताची गरज वाढली आहे. यासाठी वर्षभरात १४० ते १५० शिबिरांचे आयोजन करून सुमारे सात हजार रक्त बॅगांचे रक्तसंकलन करावे लागते. रक्तदाते, विविध सामाजिक संस्था, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे रक्ताचा पुरवठा अखंडित ठेवण्यास मदत होत आहे.दिवाळीसारख्या दीर्घ सुटीच्या कालावधीत शासकीय रक्तपेढीला रक्ताची टंचाई जाणवत आहे. सद्य:स्थितीत अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज आहे. त्यामुळे दात्यांना तसेच विविध सामाजिक संस्थांना या रक्तपेढीतर्फे रक्तदानासाठी तसेच शिबिरे आयोजित करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून दिवसाला किमान ४० ते ४५ रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा होत आहे. मागणी वाढल्याने सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्य:स्थितीत अत्यंत गंभीर रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज आहे. रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत रक्तदान करावे. तसेच सामाजिक संस्थांनी शिबिरांचे आयोजन करून सहकार्य करावे. - डाॅ. अर्जुन सुतार, जिल्हा संक्रमण अधिकारी, जिल्हा शासकीय रक्तपेढी, रत्नागिरी

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri District Hospital Blood Bank Faces Severe Shortage

Web Summary : Ratnagiri's government hospital blood bank is facing a critical shortage due to increased patient numbers and free treatment initiatives. Demand has surged, requiring approximately 5,000 blood bags annually for free distribution alone. Urgent appeals are made to donors and organizations for blood donation and camp organization.