शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 18:06 IST

प्रत्येक पथकाला वेगवेगळी ठिकाणे देऊन चौफेर तपास केला जात आहे.

चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या ‘सुवर्णभास्कर’ या बंगल्यावर हल्ल्याचा प्रयत्न प्रकरणात पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. तपासासाठी तब्बल ७ पथके पोलिसांनी तैनात केली असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच सीडीआर पोलिसांनी जमा केले आहेत. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी काही संशयितांची चौकशी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता आहे.आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण पाग येथील ‘सुवर्णभास्कर’ या बंगल्यावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या परिसरात दगड, स्टम्प आणि पेट्रोलच्या बाटल्या आढळल्याने हा थेट हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. हा हल्ला भाजप कार्यकर्ते राणे समर्थकांनी केला असल्याचा थेट आरोप करत आठ संशयितांची नावेही पोलिसांना दिली आहेत. यामध्ये भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.आमदार जाधव यांचे पुत्र समीर जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी तपासाला वेग दिला आहे. ठसे तज्ज्ञांनी नमुने घेऊन परीक्षणासाठी पाठवले आहेत, तर श्वान पथकाने घराच्या परिसरात किमान २०० मीटर अंतर पिंजून काढला. या प्रकरणी तपास वेगाने व्हावा म्हणून आता पोलिसांची तब्बल ७ पथके तैनात करण्यात आली आहेत.

प्रत्येक पथकाला वेगवेगळी ठिकाणे देऊन चौफेर तपास केला जात आहे. तसेच सुवर्णभास्कर बंगला परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासून ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. जाधव यांच्या घराजवळ तसेच कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेले २ दिवस अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई या चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे.

आदेश येताच काढला बंदोबस्त

आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी वाय प्लस स्वरूपाची सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून नेमण्यात आली होती. मात्र, मंगळवारी रात्री साडेदहा वाजता शासनाच्या एसआयडी विभागामार्फत जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा वायरलेस मेसेज आला. त्यानंतर लेखी आदेश येताच, रात्री १२.३० वाजता सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवPoliceपोलिस