राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनचे इंजिन घसरल्यानं कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 13:07 IST2021-06-26T08:18:17+5:302021-06-26T13:07:58+5:30
कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी; वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू

राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनचे इंजिन घसरल्यानं कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प
हजरत निजामुद्दीन-मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरून कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये आज पहाटे 4.15 वाजता दरड कोसळल्याने हा अपघात झाला. देखभाल दुरुस्ती आणि वैद्यकीय उपचार गाडी रत्नागिरीहून घटनास्थळी दाखल झाली आहे.
रेल्वे अधिकारी दुरुस्ती पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे. मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या आहेत.