शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: जगबुडी नदीच्या पुलानजीक स्कूल बसचा अपघात, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप बचावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:12 IST

तर बस थेट नदीत कोसळून खूप मोठी दुर्घटना घडली असती

खेड : तालुक्यातील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या भोस्ते मार्गावर मंगळवारी (२९ जुलै) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कूल बसचा अपघात झाला. जगबुडी नदीवरील पुलाजवळ ही बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली. गाडी अर्धवट थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्वच्या सर्व २५ विद्यार्थी सुखरूप आहेत. बसमध्ये सुमारे २५ विद्यार्थी होते. या भीषण घटनेत सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले असून, काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.भोस्तेकडून खेडकडे येणारी खासगी स्कूल बस अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्या अवस्थेतच बस रस्त्याच्या डाव्या बाजूला झुकली आणि कडेला जाऊन अर्धवट कलंडली. ही घटना जगबुडी नदीच्या पुलाजवळ घडली. जर बस काही अंतर पुढे गेली असती तर बस थेट नदीत कोसळून खूप मोठी दुर्घटना घडली असती. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी वेळीच धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले.गेल्या काही महिन्यात खेड परिसरात स्कूल बसच्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हा चौथा अपघात असून, त्यामुळे पालक धास्तावले आहेत. बहुतेक शाळा खासगी चालकांच्या नादुरुस्त वाहनांवर विसंबून विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी खचाखच भरले जात असून, आरटीओ, स्थानिक पोलिस आणि महामार्ग पोलिस यांच्याकडून याकडे अद्यापही गंभीरपणे पाहिले गेलेले नाही.