संध्या चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST2021-09-07T04:37:40+5:302021-09-07T04:37:40+5:30

भास्कर पेडामकर आरवली : संगमेश्वर तालुक्यातील करजुवेतील सुर्वेकाेंड सुतारवाडीतील भास्कर गणपत पेडामकर (५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या ...

Sandhya Chavan passes away | संध्या चव्हाण यांचे निधन

संध्या चव्हाण यांचे निधन

भास्कर पेडामकर

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील करजुवेतील सुर्वेकाेंड सुतारवाडीतील भास्कर गणपत पेडामकर (५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.

सूर्यकांत गराकटे

पाली : रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बाजारपेठ येथील वृत्तपत्र विक्रेते, किराणा व चिरेखाण व्यावसायिक सूर्यकांत भगवान गराकटे (६५) यांचे अल्पशा आजाराने काेल्हापूर येथे उपचार सुरु असताना निधन झाले. पालीतील व्यापारी भाई कासार व औषध विक्रेते बाबा कासार यांचे ते भाऊ हाेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

धर्मेंद्र परकर

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील काॅंग्रेसचे नेते दाजी परकर यांचे तृतीय पुत्र धर्मेंद्र उर्फ बुवा परकर (५२) यांचे काेल्हापूर येथे निधन झाले. बुवा परकर यांनी चिपळूण आगारात चालक म्हणून २७ वर्षे सेवा बजावली. ते एस. टी. कामगार संघटनेतही सक्रिय हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

Web Title: Sandhya Chavan passes away