शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ‘काळ्या सोन्या’चा काळा बाजार, अवघ्या आठ मिनिटात पाचशे ब्रास वाळूची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:22 IST

ऑनलाइनच्या गुंतागुतीतून एजंटगिरीला पेव

चिपळूण : वाळूसाठी सरकारने सुरू केलेली ऑनलाइन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने दर स्वस्त हाेऊनही सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणे कठीण बनले आहे. कधी संकेतस्थळ उघडत नाही, तर कधी टोकन नंबर मिळत नाही. या प्रक्रियेत एजंटचे जाळे वाढले असून, त्यांच्यातच टोकन नंबर मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातून वाळूचा काळा बाजार जाेरात सुरू असून, अवघ्या आठ मिनिटात पाचशे ब्रास वाळूची उलाढाल हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.चिपळुणात तीन वाळू डेपोला मान्यता मिळाली आहे. त्यातील गोवळकोट धक्का मैदान येथे दोन, तर करंबवणे येथे एक अशा तीन डेपोपैकी गोवळकोटचे दोन डेपो सुरू झाले आहेत. या वाळू खरेदीसाठी प्रति ब्रास ६०० व ५ टक्के जीएसटी इतकी रक्कम भरून ऑनलाइन बुकिंग घेतले जात आहे. या नव्या डेपोच्या माध्यमातून शासनमान्य मंजूर घरकुलांना दहा ब्रास मोफत वाळू मिळणार आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना ६५० रुपयांची वाळू मिळणेही कठीण झाले आहे. सुरुवातीचे काही दिवस ऑनलाइन पद्धतीने सरसरकट वाळू मिळत होती.मात्र, आता संकेतस्थळ वेळेवर सुरू होत नाही, आयडी मिळत नाही, गाडीचा वजनकाटा बंद पडला आहे, संकेतस्थळ सुरू झाले तर आठ मिनिटात वाळू संपते आणि पुन्हा संकेतस्थळ कधी सुरू होईल हेही सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे वाळूची गरज असलेल्या नागरिकांना डेपोच्या ठिकाणी वारंवार खेटे मारावे लागत आहेत. ऑनलाइन स्वरूपात आयडी मिळवल्यानंतर १० दिवस पाठपुरावा करूनही वाळू मिळत नसल्याची ओरड सुरू आहे.

या पद्धतीमुळे वाळूचा काळा बाजार जाेरात सुरू झाला असून, वाळूचा भाव वाढत चालला आहे. तसेच गाडी भाड्यात एक हजार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे प्रति ब्रास अडीच ते साडेतीन हजाराने वाळू विकली जात आहे. त्यासाठी छोटे-मोठे एजंट सक्रिय झाले आहेत. वाळूच्या टोकणसाठी काहीही करू नका, फक्त पैसे द्या, या पद्धतीने हे एजंट काळ्या बाजारातील वाळूचा प्रचार प्रसार करत आहेत. त्यासाठी काही नागरिकांचे आधारकार्ड मिळवण्याकरीता एजंटांमध्ये नवी स्पर्धा सुरू झाली आहे. काहींनी तर नातेवाइकांचे आधारकार्ड मिळवून नवा व्यवसायच सुरू केला आहे. या प्रकाराबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsandवाळू