कोतळूकमध्ये एकाच दिवशी सापडले १२ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:28 IST2021-04-03T04:28:29+5:302021-04-03T04:28:29+5:30
आबलोली : गुहागर तालुक्यातील कोतळूक गावात १२ कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी १२ रुग्ण आढळण्याची ही ...

कोतळूकमध्ये एकाच दिवशी सापडले १२ काेराेना पाॅझिटिव्ह
आबलोली : गुहागर तालुक्यातील कोतळूक गावात १२ कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी १२ रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.
३१ मार्च रोजी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ६० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ३३ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून १५ पाॅझिटिव्ह, तर १८ निगेटिव्ह आहेत. उर्वरित २७ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. १५ पाॅझिटिव्हमध्ये कोतळूकचे १२, वेळंब घाडेवाडीचे २, तर खोडदेचा १ असे रुग्ण आहेत. सर्व जणांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. गावडे आणि आरोग्य कर्मचारी यांनी कोतळूक गावात भेट देऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. आशा सेविकांमार्फत रुग्णांची पाहणी करण्यात येत आहे.