उतारवयात गायन कला जपणारे ‘सदाशिव राऊत’
By Admin | Updated: October 13, 2016 23:52 IST2016-10-13T23:52:44+5:302016-10-13T23:52:44+5:30
गुहागर तालुका : नवीन गायक घडविण्यात आनंद

उतारवयात गायन कला जपणारे ‘सदाशिव राऊत’
आबलोली : गुहागर तालुक्यातील नरवण - पंघरवणेवाडी येथील रहिवासी सदाशिव सीताराम राऊत हे वयाच्या साठीनंतरही आपली गायन परंपरा अविरतपणे जोपासत आहेत. नवीन पिढीला मार्गदर्शन करुन त्यांना घडविण्यातच आपल्याला आनंद वाटतो, असे ते अभिमानाने सांगतात.
साधारणपणे वयाच्या १६व्या वर्षापासून त्यांनी गायन कलेला वाहून घेतले आहे. आपल्या स्थानिक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी नाचाच्या विविध स्पर्धांमध्ये गायन केले. ‘तुरेवालेबुवा’ म्हणून त्यांना परिसरात ओळखले जाते. आपली परंपरा नवीन पिढीने पुढे जोपासावी, यासाठी ते प्रयत्नशील असतात.
दिवसभर शेतात राबल्यानंतर गाण्याचे सुमधूर बोल, ईश्वराचे स्तवन मनाला उभारी देतात आणि त्यातूनच नवनवीन गीतरचना, चाली आकारास येतात, असे ते सांगतात. आता उतार वयातसुद्धा त्यांची अनेक गाणी, सवाल - जवाब, पाठ्यपुस्तकातील कविता, बालगीते मुखोद्गत आहेत. त्यांनी गणेशोत्सव, गोकुळाष्टमी आदी उत्सवात विविध कार्यक्रम केलेले आहेत. त्यांची गायन परंपरा नवोदितांना स्फूर्ती देणारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला होत आहे. (वार्ताहर)
वयाच्या साठीनंतरसुद्धा गायन परंपरा जोपासतात.
वयाच्या १६व्या वर्षापासून गायन कलेला वाहून घेतले.
स्थानिक मंडळाच्या माध्यमातून नाचाच्या विविध स्पर्धा.
‘तुरेवालेबुवा’ म्हणून परिचित.