रत्नागिरी आगारासमोर एस. टी. कामगारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:36 IST2017-07-22T17:36:41+5:302017-07-22T17:36:41+5:30

पंचवीस टक्के अंतरिम वाढ द्या, महागाई भत्ता अदा करण्याची मागणी

S before Ratnagiri Agra T. Workers' demonstrations | रत्नागिरी आगारासमोर एस. टी. कामगारांची निदर्शने

रत्नागिरी आगारासमोर एस. टी. कामगारांची निदर्शने

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. २२ : पंचवीस टक्के अंतरिम वाढ द्या, महागाई भत्ता त्वरित अदा करा या मागण्यांसाठी एस. टी. कामगार संघटनेने एस. टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली.


गेल्या काही महिन्यांपासून एस. टी. कामगार संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी झटत आहे. पाच महिन्यांपूर्वी या मागण्यांसाठी संघटनेने तीव्र आंदोलन केले होते. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर दखल घेत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. परंतु, अद्यापही हे आश्वासन अंमलात आणलेले नाही. त्यामुळे पुन्हा एस. टी. कामगार संघटनेने गुरूवारी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.


यावेळी एस. टी. कामगार संघटनेच्यावतीने २५ टक्के अंतरिम वाढ द्यावी,१ जुलै २०१६ पासूनचा ७ टक्के महागाई भत्ता अदा करावा, यासह अनेक मागण्यांसाठी विभागीय कार्यालयाबाहेर एस. टी. कामगार संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

Web Title: S before Ratnagiri Agra T. Workers' demonstrations