शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एस. एम. ग्लोबलच्या फसवणुकीचा आकडा पोहोचला ९६ लाखांपर्यंत, अटकेत असलेल्या तिघांच्या कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:03 IST

फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षक, पोलीस, निवृत्त कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश

मंडणगड : एस. एम. ग्लोबल नावाच्या कंपनीत पैसे गुंतवणूक करून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मंडणगड पोलीस स्थानकात ६० लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करताना हा आकडा ९६ लाखांपर्यंत पोहोचला आहे. तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांत एस. एम. ग्लोबल कंपनी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत ॲड. यश घोसाळकर यांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी मंडणगड पोलिस स्थानकात प्रथम फिर्याद दाखल केली. ही फिर्याद दाखल होताच मंडणगड पोलिसांनी कारवाई सुरू करून ४ नोव्हेंबर २०२२ रोजी मंडणगड नगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक हरेश मर्चंडे (रा. मंडणगड), परेश वणे, नीलेश रक्ते (रा. पाले) या तिघांना अटक केली आहे.ॲड. यश घोसाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये सुमारे ६० लाखांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. पाेलिसांनी तपासाला सुरुवात करताच फसवणुकीचा आकडा सुमारे ९६ लाखांपर्यंत पोहाेचला आहे. हा आकडा काही कोटीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षक, पोलीस, निवृत्त कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये निम्म्याहून अधिक शासकीय कर्मचारी असल्याने तक्रार दाखल करण्यास कोणी समोर येत नाहीत. पाेलिसांनी ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन शासनाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

एजंटांनी तालुका सोडलाकंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांनाही कंपनीचा एजंट बनवण्यात येत होते. त्यामुळे गुंतवणुकीबरोबरच एजंट होऊन अधिक कमाई करण्यासाठी अनेक एजंटही झाले आहेत. अशा एजंटांना धडकी भरली आहे. त्यामुळे अनेकांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. तर अनेक जण तालुका सोडून गेल्याची माहिती पुढे येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस