शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

स्फोटके सापडल्याच्या अफवेने रत्नागिरीत उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:05 IST

Crimenews Ratnagiri police- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्याच्या अनुषंगाने शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन रत्नदुर्ग (डमी डिकॉय) ही मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनअंतर्गत भाट्ये येथे बनावट दहशतवादी व स्फोटके पकडल्यावर अवघ्या काही तासातच शहरात स्फोटके सापडल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण हे प्रात्यक्षिक असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

ठळक मुद्देस्फोटके सापडल्याच्या अफवेने रत्नागिरीत उडाली खळबळसंपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचे ऑपरेशन रत्नदुर्ग

रत्नागिरी : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्याच्या अनुषंगाने शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन रत्नदुर्ग (डमी डिकॉय) ही मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनअंतर्गत भाट्ये येथे बनावट दहशतवादी व स्फोटके पकडल्यावर अवघ्या काही तासातच शहरात स्फोटके सापडल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण हे प्रात्यक्षिक असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेसाठी रेड फोर्स (शस्त्र पक्ष) व ब्ल्यू फोर्स अशी दोन पथके तयार केली होती. रेड फोर्सकडून जिल्ह्यातील मर्मस्थळे, गर्दीची ठिकाणे, चेकपोस्ट तयार केली होती. रेड फोर्स म्हणून २ वाहने, ६ बनावट दहशतवादी याचा वापर करण्यात आला.

या दहशतवाद्यांकडून बनावट स्फोटक पदार्थ वाहनातून वाहतूक करुन जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी वाहून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ब्ल्यू फोर्स म्हणून ३५ पोलीस अधिकारी व २३२ पोलीस अंमलदार, ७० होमगार्ड, २७ सुरक्षा वॉर्ड इत्यादी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाट्ये चेकपोस्ट येथे रेड फोर्समधील बनावट दहशतावाद्यांनी बनावट स्फोटक पदार्थ वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे बनावट दहशतवादी यांना वाहनासह पकडण्यात आले. त्यांच्याकडे संशयित वस्तू आढळल्याने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवून राखीव फोर्स, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशामक दल यांना पाचारण करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली होती.बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून संशयित वस्तूंची तपासणी करण्यात आली. त्यानंतर चेकपोस्टवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याच प्रकारे गुहागर पोलीस स्थानक हद्दीतील आबलोली चेकपोस्ट व जयगड पोलीस स्थानक हद्दीतील खंडाळा येथेही सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्यात आली. मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी