शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

छप्पर कोसळून तिघे जखमी

By admin | Updated: July 3, 2016 23:53 IST

महिला गंभीर : चक्रीवादळाचा तडाखा; हातिवले येथील दुर्घटना

 राजापूर : झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तालुक्यातील हातिवले येथील घराचे छप्पर (पत्रे) अंगावर पडून एक महिला गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. यातील जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, गंभीर दुखापत झालेल्या रूपाली सुभाष रसाळ (वय ३७) यांना अधिक उपचारार्थ रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या चक्रीवादळामध्ये राजापूर तालुक्याच्या काही भागात पडझड झाल्याचा घटना घडल्या आहेत. गेले दोन-चार दिवस पावसाने चांगलाच जोर घेतलेला असून, शुक्रवारी रात्री राजापूर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. दरम्यान, शनिवारी रात्री तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार चक्रीवादळ झाले. त्यामध्ये हातिवले कातळवाडी येथे तुकाराम सदाशिव कविस्कर यांच्या घराच्या छपराचे सिमेंटचे पत्रे कोसळले. त्यामुळे या घरात भाड्याने राहणाऱ्या तीन कुटुंबांतील अझरुद्दीन गमरुद्दीन खान (१७), साईल सुभाष रसाळ (१३) यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, पाली सुभाष रसाळ (३७) यांच्या पायावर सिमेंट पत्रा पडून गंभीर दुखापत झाली आहे. अचानक आलेल्या या वादळाचा जोर एवढा जबरदस्त होता की, कविस्कर यांच्या घराचे छप्पर उडण्याबरोबरच भिंतीचे चिरेही खाली पडले आहेत. या घराचे संपूर्ण छप्पर उडाल्याने घरात राहणारी तिन्ही कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. याच चक्रीवादळामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर शिंदेवाडी येथे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर राजापूर शहरातील आंबेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. मिठगवाणे येथील मोहन पालकर यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या घरात एकच वृद्ध महिला राहत होती. रविवारी राजापूर तहसील कार्यालयाने त्या वृद्ध महिलेला गहू, तांदूळ व रॉकेल असा प्राथमिक सुविधांचा पुरवठा केला आहे. तालुक्यातील पडवे भटवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी राजापूर तालुक्यात सरासरी ६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली असून, चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाने तातडीने हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)