खेळादरम्यानच्या दुखापतींसाठी आर.जे.सी.ई.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:29+5:302021-04-11T04:30:29+5:30

खेळ, खेळाडू, साहित्य, आयोजक संस्था आणि प्रेक्षक यांच्या पंचरंगी करमणुकीचा, मनोरंजनाचा, अस्तित्वाचा, अस्मितेच ‘और कुछ तो कर दिखाना ही ...

RJCE for injuries sustained during the game. | खेळादरम्यानच्या दुखापतींसाठी आर.जे.सी.ई.

खेळादरम्यानच्या दुखापतींसाठी आर.जे.सी.ई.

खेळ, खेळाडू, साहित्य, आयोजक संस्था आणि प्रेक्षक यांच्या पंचरंगी करमणुकीचा, मनोरंजनाचा, अस्तित्वाचा, अस्मितेच ‘और कुछ तो कर दिखाना ही है’ याची अजब आणि गजब मेळ असतो. ही एक आनंद यात्रा असते. ‘झोकून देणे’ हे ब्रीद असतं.

खेळाडूंना होणाऱ्या दुखापती लवकर बऱ्या होतात. त्यांनी खांद्यातील अनुषंध (Tears) गुडघ्यातील गुडघा धरून ठेवणाऱ्या लिगामेन्टस् त्याला ‘अ‍े.सी.एल.’ टेअर्स म्हणतात आणि क्वचितच होणाऱ्या डोक्याची इजा (हेड इन्जुरी) याची वेगळी वैद्यक आणि फिजिओथेरपी उपचारक पद्धत असते. ऑर्थोपेडिक सर्जन यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते आणि डोक्यांच्या होणाऱ्या रजेमध्ये यांच्यासह न्युरो फिजिशियन आणि न्युरो सर्जन सोबत उत्कृष्ट नर्सिंग केअर, अनुभवी फिजिओथेरापी व्यवस्थापन, इजा असलेला खेळू उभा राहण्यास, परत खेळामध्ये परतण्यास आणि क्वचित जीवनात स्थिर होण्यात यांची मदत होते. सायकॉलॉजिस् प्रसंगी मनोविकारतज्ज्ञ यांचीही गरज लागते. घरची, नातेवाइकांची, मित्रांची आणि समाजाची ‘हम साथ साथ है’ ही खेळाडूला उभारी देणारी एक सकारात्मक शृंखला असते. शासन या खेळाडूंना नक्की मदत करते.

आपण आता खेळादरम्यानच्या दुखापती यावर तातडीने काय उपचार आणि आधार देता येईल, हे मी सांगणार आहे. त्वरित उपचारक व्यवस्थापनासाठी स्पोर्टस् मेडिसिनमध्ये R.I.C.E. (राईस) हे तत्त्व वापरलं जातं. ते खूपच उपयुक्त आहे. बऱ्याच वेळा किंवा खेळ आटोपून घरी जाईपर्यंत खेळाडू बराचसा सावरलेलाही असतो.

त्या राईस उपचारक तत्त्वाकडे वळण्यापूर्वी याचं महत्त्व प्रथम समजावून घेऊ या ‘राइस’ यामुळे १) दुखणं किंवा त्यांची तीव्रता कमी होते, २) सूज ओळखते, त्याचा फायदा शरीरांतर्गत इजा झालेला सांधा किंवा स्नायू यातील सूजेमुळे साचणारा ईडीमा (म्हणजेच सूज) कमी होते. दुखणं कमी होतं. सांधा किंवा स्नायू याची हालचाल सुरळीत होते. पुढची दुखापत टाळता येते. ३) या सांधा आणि स्नायू यांच्याशी संबंधित रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे पेशी समूहाची गरज भागते. (त्याला वैद्यक भाषेत Reduce inflammatory exudates and maintain metabolic demands of tissues असं म्हणतात) ४) त्या सांध्यामुळे, स्नायूमुळे किंवा पेशी समूहामुळे पुढच्या पेशी समूहाला, स्नायूंना संरक्षण मिळते. पुढचा स्नायूंचा धोका टाळता येतो, तसेच त्याच स्नायू गटातील पेशी समूहाला पुढील इजा होण्यापासून संरक्षण मिळते. ५) याचा फायदा जखमी किंवा इजा पोहोचलेला स्नायू, खांदा किंवा पेशी समूह आणि त्यांच्या सूत्रबद्ध शिस्तबद्ध ठेवणं, व्यवस्थित रहावी यासाठी फायदा होतो. ६) सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे रक्ताभिसरण (Cardiovascular) आणि स्नायू आणि सांधे, त्यांचा फिटनेस आणि त्याची कृतिशीलता उत्तम रहाते, उत्तम राहण्यासाठी मदत ठरते. खेळाडू इजा झालेला त्याला धीर येतो.

अजून एक महत्त्वाचे आहे. प्रत्येक टीमजवळ फर्स्ट एक बॉक्स त्यात क्रेप बँडेज, इलेस्टिक मेडिसिव्ह बँडेज, झिंक ऑक्साइट टेप (पट्टी), हँड ग्लोव्हज् अर्थात, डिप्स उपयोगात आणा आणि टाकून द्या. (Disposable), जखमा, सर्व सामान, बर्फाची पेटी, पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या इत्यादी वस्तू आणि तातडीचे संपर्क ध्वनी डॉक्टरांचे हवेतच हवेत. अर्थात, आज याबाबत खूपच जागृती आली आहे. आता आपण राइस व्यवस्थापन याकडे वळू या.

- डाॅ.दिलीप पाखरे

Web Title: RJCE for injuries sustained during the game.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.