शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 3:54 PM

Chiplun Ncp panchyatsamiti Ratnagiri- चिपळूण येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देचिपळूण पंचायत समिती सभापतीपदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवडअनुजा चव्हाण यांच्या बंडाकडे शिवसेनेकडून पूर्णपणे दुर्लक्ष

चिपळूण : येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली. यानंतर हा पॅटर्न राज्यात अन्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून राबविण्यात येऊ लागला. यानुसार गेल्या सव्वा वर्षापूर्वी येथील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत तो राबविण्यात आला.

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या येथील नेत्यांच्या बैठकीत सव्वा वर्षे सेनेचा, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला संधी देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार या पदासाठी सव्वा वर्षापूर्वी सभापती म्हणून शिवसेनेच्या धनश्री शिंदे, तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पांडुरंग माळी यांची वर्णी लागली.राष्ट्रवादीकडून या पदासाठी दोनजण इच्छुक असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण पवार यांनी काम पाहिले.या निवडीनंतर आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंत खताते, माजी सभापती शौकत मुकादम, पूजा निकम, इब्राहिम दलवाई, पांडुरंग माळी, सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, राजू जाधव, विकास गमरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रवादीकडून दोन नावेसव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर धनश्री शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आताच्या सव्वा वर्षासाठी हे पद राष्ट्रवादीला देण्यात आले असून, या पदासाठी सदस्या रिया कांबळे यांच्यासह समीक्षा घडशी यांचे नाव पुढे आले होते.अनुजा चव्हाण बेदखलशिवसेनेच्या सदस्या अनुजा चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी फारशी दखलही घेतलेली नाही. गटनेते राकेश शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला त्या उपस्थित होत्या. त्यानंतर सभापती निवडीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म पाळून सभापती पदासाठी रिया कांबळे यांना पाठिंबा दिला.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीChiplunचिपळुणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरी