राजापूर : रस्त्यात पडलेले सुमारे दोन तोळ्यांचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे मालकाला परत करणाऱ्या माडबनचे परेश वाघधरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात येत आहे.अनिल कृष्णा तांबे हे काही कामानिमित्त चिपळूणला चालले होते. सकाळी नाटे येथे आपली दुचाकी उभी करून एका वडापच्या गाडीतून रत्नागिरीकडे निघाले. यावेळी त्यांचे लक्ष आपल्या उजव्या हाताकडे गेले असता, हातात ब्रेसलेट नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ आपल्या पत्नीशी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर अनिल तांबे यांची पत्नी व भावाने जानशी ते नाटे संपूर्ण मार्गावर जाऊन शोधाशोध केली, पण हरवलेले ब्रेसलेट काही सापडले नाही.मात्र, काही वेळाने माडबन - मधीलवाडी येथील परेश वाघधरे यांनी अनिल कृष्णा तांबे यांना मोबाईलवर कॉल केला आणि तुमचे हरवलेले ब्रेसलेट आपल्याला सापडल्याचे सांगितले. हे ब्रेसलेट परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून प्रकाश वाघधरे यांचे आभार मानले.
दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट मालकाला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:46 IST
Crime News Ratnagiri- रस्त्यात पडलेले सुमारे दोन तोळ्यांचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे मालकाला परत करणाऱ्या माडबनचे परेश वाघधरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात येत आहे.
दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट मालकाला परत
ठळक मुद्देदोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट मालकाला परतपरेश वाघधरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक