निवृत्त वाहतूक अधिकारी नंदकुमार कुलकर्णी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:10+5:302021-04-11T04:30:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात वाहतूक अधिकारी म्हणून सेवा बजावलेले नंदकुमार गोपाळराव कुलकर्णी (६७) ...

निवृत्त वाहतूक अधिकारी नंदकुमार कुलकर्णी यांचे निधन
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात वाहतूक अधिकारी म्हणून सेवा बजावलेले नंदकुमार गोपाळराव कुलकर्णी (६७) यांचे गुरुवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
नंदकुमार कुलकर्णी हे मूळचे बेळगाव येथील राहणारे आहेत. तेथून पदवी संपादन केल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रुजू झाले. कणकवलीच्या विभागीय कार्यालयात त्यांनी सुमारे २५ वर्षे काम केले. त्यानंतर, कोल्हापूर येथेही काही काळ सेवा बजावली. या काळात त्यांनी अनेक पदांवर काम केले. २००७ मध्ये ते रत्नागिरी विभागीय कार्यालयात वाहतूक अधिकारी म्हणून रुजू झाले.
रत्नागिरीत त्यांनी हास्यक्लबची स्थापना केली होती. २०११ साली ते सेवेतून निवृत्त झाले. या कालावधीत झालेला वाहक, चालकांचा संप त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते. गुरुवारी रात्री पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, सून, नात, तसेच दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.