शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्टच्या भीतीने निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटींचा गंडा, दापोलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:35 IST

दापोली (जि. रत्नागिरी ) : डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका निवृत्त प्राध्यापकाची तब्बल १ कोटी २३ लाखांची फसवणूक केल्याचा ...

दापोली (जि. रत्नागिरी) : डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका निवृत्त प्राध्यापकाची तब्बल १ कोटी २३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीत उघडकीला आला आहे. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून विस्तार शिक्षण संचालक पदावरून निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी यांना आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक या तिघांनी ४ नोव्हेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत फोनद्वारे संपर्क साधला. संशयितांनी आपण बंगळुरू पोलिस आणि नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर जोशी यांच्या नावावर कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) शाखेत खाते असून, त्यामध्ये ३ कोटी रुपयांचा घाेटाळा झाल्याचे सांगितले.या कथित गुन्ह्याप्रकरणी ५० लाखांचा दंड आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवत जोशी यांच्यावर तिघांनी मानसिक दबाव टाकला. त्यानंतर संशयितांच्या सूचनेनुसार जोशी यांना ॲक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी २३ लाख भरायला सांगितले. डाॅ. जोशी यांनी भीतीपोटी ही रक्कम भरली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. जोशी यांनी दापोली पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार तीन संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Retired Professor Duped of ₹1.23 Crore in Digital Arrest Scam

Web Summary : A retired professor from Dapoli lost ₹1.23 crore to scammers posing as police and CBI officers. They used the threat of digital arrest and a fake ₹3 crore bank fraud case to extort money from him into various bank accounts.