शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आरामबस झाडावर आदळून पाच ठार

By admin | Updated: September 22, 2014 00:49 IST

असुर्डेतील दुर्घटना : २७ जखमी, सहाजणांची प्रकृती गंभीर, मृतांमध्ये देवगड तालुक्यातील दोघे

सावर्डे : पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील खासगी आरामबस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील २७ प्रवासी जखमी झाले. यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेनजीकच्या असुर्डे (ता. चिपळूण) गावी घडला. बसमधील एकूण २७ प्रवाशांपैकी सुनील गंगाराम कांबळे (वय २७, शिपोशी लांजा), सतेज प्रभाकर वेतकर (१७, हळदेवाडी देवगड), महेंद्र महादेव तांबे (३०, राजापूर) व एक अज्ञात प्रवासी असे चारजण जागीच ठार झाले. अज्ञात प्रवाशाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला असून त्यांच्याजवळ ओळख पटू शकेल, अशी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे या इसमाची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे. प्रियांका विनोद वेतकर (४५, तिर्लोट देवगड) यांना गंभीर जखमी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर पहाटे ५.१५ च्या सुमारास हा अपघात घडला. साईपूजा ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच- ४३/ एच २५५९) वरळीहून विजयदुर्गकडे जात होती. सुनील विष्णू टिकम (४७, गिऱ्ये विजयदुर्ग) हा बस चालवीत होता. असुर्डे घाट उतरताना दाट धुके होते. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज येत नव्हता. असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या एका झाडावर जोरदार आदळली. बसचा वेग प्रचंड असल्यामुळे ती डावीकडील पहिल्या आसनापासून शेवटच्या आसनापर्यंत झाडावर घासत गेली. बसमधील दिलीप तुकाराम पाडाळे (वय ५३, राजापूर), अनिल विठोबा झिमण (२८, जावडे लांजा), अमित जाधव (३०, राजापूर), पंकज तानाजी आतवकर (२५, गोठणे राजापूर), आत्माराम सीताराम वारीक (६२, पडेल देवगड) / पान ७ वरसलग तिसऱ्या अपघाताने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हादरला...!सावर्डे : पहाटेच्या वेळी होणारा आक्रोश आणि गगनभेदी किंकाळ्या ऐकून महामार्गानजीकचे ग्रामस्थ धावून आले. गेल्या तीन दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग हादरला आहे. आठवडाभरातील हा चौथा अपघात आहे.मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सध्या पहाटेच्या वेळी पडणारे दाट धुके, रस्त्याचा न येणारा अंदाज यामुळे अपघात वाढले आहेत. विशेष म्हणजे सध्या महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ नसतानाही हे अपघात होत आहेत. रविवारी मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक असुर्डे येथे खासगी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात २७जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २१ प्रवासी किरकोळ जखमी असून, त्यामध्ये विनोद सुदाम वेतकर (४८, तिर्लोट देवगड), जगदीश गजानन मयेकर (५२, जैतापूर), दीपक पांडुरंग करंजे (४८, ठाणे), लक्ष्मी प्रभाकर बेटकर (४५, मालवण), प्रशांत तानाजी आतवकर (२३, गोठणे, राजापूर), द्रौपदी करंगुटकर (६०, आंबोळगड राजापूर), शारदा वसंत ठुकरुल (६०, आंबोळगड), तृप्ती दत्तात्रय पावसकर (४८, शिरसे, राजापूर), कुलदीप मधुकर वेतकर (२९, देवगड), बाळा नारायण निंबाळकर (४८, कात्रादेवी, राजापूर), मधुकर सुदाम वेतकर (६५, तिर्लोट देवगड), सचिन भास्कर वेतकर (३२, तिर्लोट देवगड), सूर्यकांत आप्पा भाताडे (४४, भांबेड), वैशाली जनार्दन गिरकर (५५, गिर्ये देवगड), दीपाली दीपक तिरलोटकर (४०, तिर्लोट), नीतेश अशोक मोहिते (२१, शिपोशी), विवेक जनार्दन गिरकर (२४, गिर्ये देवगड), संध्या महेंद्र मयेकर (३७, सांगवे राजापूर), सुमित बबन गिरकर (२३, गिर्ये), आशिष सुनील मोंडे (२१, मोंडपाल देवगड), प्रमिला बबन गिरकर (४५, गिर्ये) यांचा समावेश आहे.आरवली येथे मालवण - मुंबई एस. टी. दरीत कोसळून अपघात झाला आहे. मानसकोंड येथे शुक्रवारी झालेल्या खासगी आराम गाडीच्या अपघातात दोनजण ठार झाले होते. शनिवारी आगवे पॅसिफिक हॉटेलजवळ पुणे-देवरुख एस. टी. बस दरीत कोसळली होती. त्याच पट्ट्यात आज (रविवारी) आराम बस झाडावर आदळून आणखी पाचजणांचा बळी गेला.गेल्या आठवडाभरात झालेले चारही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते चिपळूणदरम्यान झाले आहेत. (वार्ताहर)