करबुडे येथे लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:47+5:302021-06-16T04:41:47+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामपंचायत करबुडे येथे नागरी सुविधा अंतर्गत १०० कोविशिल्ड डोस उपलब्ध झाले. त्याचे नियोजन करबुडे सरपंच हर्षला ...

करबुडे येथे लसीकरणाला प्रतिसाद
रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामपंचायत करबुडे येथे नागरी सुविधा अंतर्गत १०० कोविशिल्ड डोस उपलब्ध झाले. त्याचे नियोजन करबुडे सरपंच हर्षला वेदरे यांनी केल्यामुळे लसीकरण व्यवस्थित पार पडले. यावेळी आरोग्य केंद्राचे डाॅ. मोरताडे उपस्थित होते.
संरक्षक भिंत उभारावी
राजापूर : राजापूर-शीळ गोठणे-दोनिवडे सौंदळ रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यालगत संरक्षक भिंत घालण्याचे आश्वासन न पाळल्याने पंचक्रोशी समितीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष जमीर खलिफे यांना निवेदन सादर करत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली.
खेडमध्ये वृक्षारोपण
खेड : तालुका युवती सेनेतर्फे बांधकाम विभाग, पंचायत समिती व माणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका अधिकारी सिध्दी शिंदे, उपतालुका अधिकारी सुप्रिया कदम, पूनम जाधव, सई चिखले, स्नेहल मोरे उपस्थित होत्या.
मुरुड रस्त्याचे खड्डे भरले
दापोली : दापोली तालुक्यातील आसूद पुलाकडून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे अखेर प्रशासनाकडून भरण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हा मार्ग नव्यानेच करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.
समिरा ठोंबरचे सुयश
आबलोली : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा कास्ट्राईब संघटनेतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील माटलवाडी जिल्हा परिषद आदर्श शाळेची समिरा अनंत ठोंबरे हिने सहावी ते आठवी या गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.