राष्ट्रवादी पेढे गटात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:17+5:302021-05-05T04:51:17+5:30

अडरे : रक्ताचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेता आमदार शेखर निकम यांनी व्हॅक्सिनपूर्वी रक्तदान करा, असे आवाहन केले हाेते. ...

Response to Blood Donation Camp in Nationalist Groups | राष्ट्रवादी पेढे गटात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

राष्ट्रवादी पेढे गटात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

अडरे : रक्ताचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेता आमदार शेखर निकम यांनी व्हॅक्सिनपूर्वी रक्तदान करा, असे आवाहन केले हाेते. या आवाहनानुसार जिल्हा परिषद पेढे राष्ट्रवादी गटातर्फे माहेश्वरी भवन कळंबस्ते येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‌घाटन तालुक्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, युवती जिल्हाध्यक्ष दिशा दाभोलकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे उपस्थित होते.

Web Title: Response to Blood Donation Camp in Nationalist Groups