‘खेड एक सामाजिक कार्य’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:45+5:302021-05-24T04:29:45+5:30
खेड : येथील एक सामाजिक कार्य संस्थेतर्फे मागासवर्गीय समाजमंदिरात रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या रक्तदान शिबिरात ५०हून ...

‘खेड एक सामाजिक कार्य’च्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
खेड : येथील एक सामाजिक कार्य संस्थेतर्फे मागासवर्गीय समाजमंदिरात रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या रक्तदान शिबिरात ५०हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी पोलीस निरीक्षक निशा जाधव, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे, रिपाइंचे शहरप्रमुख दीपेंद्र जाधव, शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल दळवी यांच्यासह रमेश कासारे, सीमा कासारे, चेतना रूके, भाग्यश्री जाधव उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात रक्ताची कमतरता भासत असल्याने एक सामाजिक कार्य संस्थेचे अध्यक्ष दयानंद कासारे, सचिव सतीश कदम व अन्य सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदात्यांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दयानंद कासारे, सतीश कदम, संदीप कदम, वैभव ना. खेडेकर, राहुल बनसोडे, स्वप्निल कदम, पराग गमरे, पंकज कदम, राहुल सके, रोहन जाधव, दीपेश जाधव, राजपाल भिडे, समीर जाधव, सुधीर जाधव, आदींनी प्रयत्न केले.
---------------------------
khed-photo231
खेड येथील रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन एक सामाजिक कार्य संस्थेचे अध्यक्ष दयानंद कासारे यांनी गाैरव केला.