विहिरीत पडलेल्या महिलेला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 01:50 PM2021-02-17T13:50:02+5:302021-02-17T13:51:32+5:30

Lanja Ratnagiri News- लांजा शहरातील चव्हाटा मंदिर येथे विहिरीत पडलेल्या ५० वर्षीय प्रौढ महिलेला काही धाडसी तरूणांनी वाचवले. स्नेहल पांचाळ असे या महिलेचे नाव आहे.

Rescued the woman who fell into the well | विहिरीत पडलेल्या महिलेला वाचवले

विहिरीत पडलेल्या महिलेला वाचवले

Next
ठळक मुद्देविहिरीत पडलेल्या महिलेला वाचवलेप्रौढ महिलेला काही धाडसी तरूणांनी वाचवले

लांजा : शहरातील चव्हाटा मंदिर येथे विहिरीत पडलेल्या ५० वर्षीय प्रौढ महिलेला काही धाडसी तरूणांनी वाचवले. स्नेहल पांचाळ असे या महिलेचे नाव आहे.

शहरातील चव्हाटा मंदिर येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या शेजारी २५ फूट विहीर आहे. विहिरीत १० फूट पाणी होते. सोमवारी सकाळी ८.३० वा. तेथेच शेजारी राहणाऱ्या स्नेहल भिकाजी पांचाळ या ५० वर्षीय महिला पाणी काढण्यासाठी गेली असता तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत जाऊन पडली. विहिरीत पाणी असल्याने त्यांना कोणतीच दुखापत झाली नाही.

विहिरीत महिला पडल्याचे लक्षात आल्यावर लगेचच काही तरुण धावून आले. लोखंडी पाळण्याला चारही बाजूने रस्सी बांधून तो विहिरीत सोडण्यात आला. संदीप भडेकर हा तरुण धाडसाने विहिरीत उतरला. विहिरीच्या वरच्या बाजूला नगरसेवक मंगेश लांजेकर, प्रकाश लांजेकर, राजेश भडेकर, तुषार लांजेकर, नीलेश लांजेकर, प्रमोद बेलवलकर, निखील शेट्ये, विपुल कोत्रे, नवनीत लांजेकर, नरेश भुर्के व स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी हजर होते.

रस्सीचा आधार

बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे विहिरीत पडल्यानंतर स्नेहल पांचाळ यांनी आपला जीव वाचविण्यासाठी विहिरीत सोडण्यात आलेल्या पंपाच्या रस्सीचा आधार घेतला आणि जिवाच्या आकांताने मदतीसाठी धावा केला. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्या बाहेर आल्या.

Web Title: Rescued the woman who fell into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.