कोल्हापुरातील ५ जणांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 16:42 IST2020-12-15T16:42:19+5:302020-12-15T16:42:44+5:30
Ganpatipule : बांबवडेतील ९ जण आज मंगळवारी सकाळी ९.३० वाजता गणपतीपुळे येथे आले.

कोल्हापुरातील ५ जणांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना वाचवले
रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथील ५ जणांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना वाचवण्यात आले.
बांबवडेतील ९ जण आज मंगळवारी सकाळी ९.३० वाजता गणपतीपुळे येथे आले. १२ वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यातील ५ जण लाटेसोबात पाण्यात ओढले गेले.
बाकीच्या तरुणांनी आरडाओरडा केल्यानंतर किनाऱ्यावरील जीवरक्षक आणि किनाऱ्यावरील व्यावसायिक तातडीने पाण्यात उतरले आणि त्यांनी सर्वांना बाहेर काढले. त्यातील सुरज धनाजी कदम याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याची प्रकृती सुधारत आहे.