शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प होणारच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ठाम विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 15:50 IST

संजय राऊत आमदारांना रेडे म्हणतात. मात्र त्यांना शिवसेनेने तिकीट दिले तेव्हा ते रेडे नव्हते. आताच ते रेडे कसे झाले, असा प्रश्न आमदार बावनकुळे यांनी केला.

रत्नागिरी : आजपर्यंत विविध प्रकल्पांवरुन राजकारण झाले. प्रकल्पांचा फुटबॉल केल्यानेच रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याने रिफायनरी प्रकल्पाबाबत असे होऊ देणार नाहीत. लोकांचे गैरसमज दूर करुन रिफायनरी प्रकल्प होईल, असे ठाम विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत आमदार बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रकल्प उभारण्यासाठी जे ठिकाण निश्चित केले जाईल, तेथेच प्रकल्प उभा होईल. त्यासाठी सरकार ठामपणे उभे आहेच, पण कोणी उगाच विरोध करत असतील तर पक्षही तेथे ठाम उभा राहील. आतापर्यंत अनेक प्रकल्पांचा फुटबॉल करण्यात आला आहे. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे होऊ देणार नाहीत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकही प्रकल्प परत जाण्याचा प्रश्नच येणार नाही.नागरिकांचे, शेतकऱ्यांचे हित जोपासून पुढील ५० वर्षांचा विकास होत असेल तर तो करायलाच हवा. सरकारची इच्छाशक्ती असेल तर गैरसमज दूर करुन विरोध संपवता येतो. प्रश्न सोडवून त्यांचे समाधान केले तर विरोध होत नाही. काही राजकारणी जेव्हा ‘कन्व्हिन्स’ करु शकत नाहीत, तेव्हा ते ‘कन्फ्यूज’ करतात. म्हणून लोक विरोध करतात. मात्र शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या मनात काय आहे, हे समजून घेऊन त्यावर पर्याय देतील. त्यामुळे विरोध राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.शिवसेना सोडून भाजपचा हात धरणाऱ्या आमदारांनी जनतेशी प्रतारणा केली आहे, असे वाटत नाही का, असा प्रश्न बावनकुळे यांना करण्यात आला. या आमदारांना जनतेने शिवसेना भाजप म्हणून निवडून दिले होते. मात्र युतीने आलेल्या शिवसेनेने सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हात मिळवणी केली, ही जनतेशी, मतदारांशी प्रतारणा नव्हती का? राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे म्हणण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.आताच ‘रेडे’ कसे झाले?संजय राऊत आमदारांना रेडे म्हणतात. मात्र त्यांना शिवसेनेने तिकीट दिले तेव्हा ते रेडे नव्हते. आताच ते रेडे कसे झाले, असा प्रश्न आमदार बावनकुळे यांनी केला. त्यामुळे असे बोलणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानांबाबत प्रश्न कशाला विचारता, असेही बावनकुळे यांनी हसत हसत विचारले

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे