शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात ‘केरा केरलम’वाणाच्या लागवडीसाठी शिफारस, वैशिष्ट्ये काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:31 IST

उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावर

रत्नागिरी : कोकणात नारळाचे अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ वाणाची लागवड करण्यासाठी रत्नागिरीतील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्राने शिफारस केली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये ही शिफारस करण्यात आली आहे.महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन मुख्यत्वे कोकण किनारपट्टीत घेतले जाते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ पिकाखाली क्षेत्र अधिक आहे. अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात क्षेत्र विस्तार होत आहे. कोकणामध्ये पारंपरिकपणे ‘बाणवली’ या उंच माडाची लागवड आहे.

कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने सन २०११ पासून भारतामध्ये विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार नारळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ हे वाण आशादायी आढळले.

परभणी येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये नारळामधील ‘केरा केरलम’ या वाणाची लागवडीसाठी शिफारस केली आहे. या संशोधन कार्यात नारळ संशाेधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. राजन खांडेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे, डॉ. पराग हळदणकर यांचे योगदान आहे.

उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावरजगामध्ये ९० हून अधिक देशात नारळ हे पीक घेतले जाते. भारत हा जगातील एक प्रमुख नारळ उत्पादक देश आहे. भारतामध्ये नारळ पिकाखाली २१.९० लाख हेक्टर क्षेत्र असून, २१,२०७ दशलक्ष नारळ उत्पादन आहे. जगाच्या उत्पन्नाच्या एकूण ३१ टक्के उत्पन्न हे भारतात होते. भौगोलिक क्षेत्रात भारताचे स्थान १७.१५ तृतीय क्रमांकावर असले तरी उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे.‘केरा केरलम’ची वैशिष्ट्ये‘केरा केरलम’ नारळाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रती माड प्रती वर्ष ११८ फळांचे सरासरी उत्पादन आहे. खोबरे प्रती नारळ १७० ग्रॅम, तेलाचे प्रमाण ६९ टक्के आहे, तसेच त्याच्या उत्पन्नामध्ये सातत्य आहे.