सीईटी केंद्रासाठी रत्नागिरीचा प्रस्ताव धूळखात पडला

By मेहरून नाकाडे | Updated: April 4, 2025 17:13 IST2025-04-04T17:13:28+5:302025-04-04T17:13:41+5:30

मेहरून नाकाडे रत्नागिरी : एमएचटी, सीईटी ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांसाठीची राज्यस्तरीय परीक्षा आहे. मात्र, या परीक्षांसाठी रत्नागिरी ...

Ratnagiri's proposal for CET center not approved | सीईटी केंद्रासाठी रत्नागिरीचा प्रस्ताव धूळखात पडला

सीईटी केंद्रासाठी रत्नागिरीचा प्रस्ताव धूळखात पडला

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : एमएचटी, सीईटी ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांसाठीची राज्यस्तरीय परीक्षा आहे. मात्र, या परीक्षांसाठीरत्नागिरी जिल्ह्यात केवळ दाेन केंद्र असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फरपट हाेत आहे. विशेष म्हणजे या परीक्षांसाठी केंद्र मिळण्याबाबत रत्नागिरीतील फिनाेलेक्स अकॅडमीने प्रस्ताव पाठविला आहे. पण, या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही एमएचटी, सीईटी परीक्षेचे केंद्र देण्यात आलेले नाही. जिल्ह्यात केवळ दाेन ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आल्याने रत्नागिरीसह अन्य सहा तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अन्य तालुक्यात जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय हाेते.

रत्नागिरी येथे परीक्षा केंद्र झाल्यास विद्यार्थ्यांची फरपट थांबेल. याबाबत रत्नागिरीतील फिनोलेक्स अकॅडमीने एमएचटी, सीईटी परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत तसा प्रस्तावही सीईटी सेल यंत्रणेकडे पाठविला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप धूळखात पडला आहे.

सहा वर्षापूर्वी परीक्षा रत्नागिरीत

सहा वर्षापूर्वी सलग दोन वर्ष एमएचटी, सीईटी परीक्षा रत्नागिरीतील फिनोलेक्स अकॅडमी येथे घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर परीक्षा घेणारी एजन्सी बदलली व परीक्षा केंद्र बंद झाले. त्यामुळे राजापूर, लांजा आणि रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना भरणे (खेड), खेर्डी (चिपळूण) येथे जावे लागत आहे.

जेईई, नीट परीक्षा रत्नागिरीत

फिनोलेक्स अकॅडमी येथे अभियांत्रिकी शिक्षणासाठी द्यावी लागणारी जेईई, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट या केंद्रीयस्तरावरील परीक्षेसाठीचे केंद्र आहे. मात्र, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या एमएचटी, सीईटी परीक्षेचे केंद्र देताना दुजाभाव केला जात आहे.

एजन्सीचा दुजाभाव

सीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी नॅशनल रिक्वायरमेंट कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीअंतर्गत २० विविध एजन्सी आहेत. या एजन्सी परीक्षा केंद्र निश्चित करतात. या एजन्सीने केंद्र देण्याबाबत निरुत्साह दाखविला आहे.

Web Title: Ratnagiri's proposal for CET center not approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.