शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:21 IST

दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले

रत्नागिरी : ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी लागली आहे. यात रत्नागिरीच्या हापूस आंब्याने ‘सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा’ म्हणून रत्नागिरीला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला असून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर आणि अकोला हे अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकाचे विजेते ठरले आहेत. दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले.‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन’च्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडून त्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करणे व प्रोत्साहन देणे, जेणेकरून देशांतील संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल व देशभरामध्ये समग्र सामाजिक व आर्थिक वाढ शक्य होईल, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावरून केलेल्या भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या १४ जिल्ह्यांची निवड झाली होती.भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहव्यवस्थापक ताशी डोज शेर्पा यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत ‘हापूस आंबा’ या उत्पादनाशी निगडित उद्योगांना भेट देऊन आढावा घेतला होता. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले होते.अखेर रत्नागिरी जिल्ह्याच्या हापूसने देशात प्रथम पुरस्कार मिळवत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. सोमवारी (दि. १४ जुलै) दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रेखा गुप्ता, राज्याच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे मंत्री जतीन प्रसाद उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक हणबर, आताचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा पणन अधिकारी मिलिंद जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत कदम यांनीही योगदान दिले.